कर्जुले हर्या येथे मातोश्री शैक्षणिक संकुलामध्ये दिंडीचे स्वागत !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पोखरी येथील श्री रंगदास स्वामी महाराजांच्या दिंडी सोहळ्याचे कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक संकुलामध्ये स्वागत करण्यात आले.
यावेळी सर्व विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यासाठी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर व सहकारी उपस्थित होते.
यावेळी वारकऱ्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था मातोश्री शैक्षणिक संकुल या ठिकाणी करण्यात आली होती. यावेळी कीर्तन भजन हा भक्तिमय कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. त्यामुळे मातोश्री शैक्षणिक संकुलामध्ये सर्व वातावरण हे भक्तिमय झाले होते. सर्व वारकऱ्यांचे स्वागत डॉ. दीपक आहेर यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. आहेर म्हणाले की वारकरी हा शेतकरी असून तो खऱ्या अर्थाने विठ्ठलाची भक्ती पूर्ण भक्तीभावाने करतो. वारकऱ्याची सेवा केल्याने ईश्वराची सेवा केल्याचे समाधान मिळते.
यावेळी पोखरी येथून वारकऱ्यांसमवेत ग्रामस्थ ही उपस्थित होते. यावेळी पोखरी गावचे सरपंच सतीश पवार म्हणाले की मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान नेहमी अध्यात्मिक सामाजिक उपक्रम आपल्या संकुलामध्ये राबवत असते. वारकऱ्यांची सेवा करून अध्यात्मिक कार्य करण्याचा त्यांनी मनोभावे प्रयत्न केला. मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज अनेक गोरगरीब शेतकऱ्याची मुले शिक्षण घेत आहेत. तसेच डॉ. आहेर यांनी मातोश्री हॉस्पिटल हे एक सुसज्ज असे हॉस्पिटल आपल्या पारनेर तालुक्यात उभे केले असून सर्वसामान्य आदिवासी गरीब घटकातील रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात आहे. डॉ. आहेर हे रुग्णसेवेचे उत्तम कार्य करत आहे. सर्वसामान्य घटकातील व्यक्तीला त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. वारकऱ्यांचे स्वागत करून खऱ्या अर्थाने डॉ. आहेर यांनी सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे. पोखरी या ठिकाणावरून यावेळी
सरपंच सतीश पवार समवेत गवराम दरेकर , दत्तात्रय शिंदे, विक्रम पवार, बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण पवार, पंकज खैरे, संदीप खैरे, किसन डोंगरे, गणेश बेलकर, बाबाजी वाकळे, आदि वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.