इतर

वासुदे गावात २ ५०० विद्यार्थ्यांना आमदार निलेश लंकेंकडून शैक्षणिक साहित्य !

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :


वासुंदे गावात आल्यावर मला हंगा गावात आल्यासारखे वाटत असून विकासकामे असो वा शैक्षणिक कामे यासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून कोणते गोष्टीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही युवा नेते दीपक लंके यांनी दिली आहे. शनिवार दिनांक 2 जुलै रोजी वासुंदे गावातील वासुंदे बोकनकवाडी ठाकरवाडी लाखे वस्ती वाबळे वस्तीवर जवळपास ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप दीपक लंके यांच्या हस्ते करण्यात आले


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शाल बुके व सत्काराला फाटा देत पारनेर तालुक्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपल्या मतदारसंघात राबविला आहे.
माझ्या सत्काराला हार तुरे किंवा शाल बुके न आणता विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी केले होते .त्या आव्हानाला प्रतिसाद देत जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य यांच्या संपर्क कार्यालयात जमा झाले होते . या शैक्षणिक साहित्याचे चालू वर्षी वाटप करण्यात आला असून जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य ६० ते ७० गावांमध्ये वितरित करण्यात आलेले आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले होते . त्यामुळे ऑनलाईन शिक्षण दरम्यान सुद्धा आमदार निलेश लंके यांनी सर्वतोपरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहकार्य केले होते.


यावेळी जिल्हा परिषद क्लब चे अध्यक्ष व नगर सह्याद्री संपादक शिवाजी शिर्के, युवा नेते दीपक लंके, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, मारुती दादा झावरे, वासुंदे सेवा सोसायटीचे व्हा . चेअरमन रा. बा. झावरे, माजी उपसरपंच महादू भालेकर ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य वासुंदे पोपट साळुंखे, पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, डॉ. उदय बर्वे, गीताराम जगदाळे उद्योजक किरण झावरे, युवा नेते स्वप्निल झावरे, प्रसिद्ध बैलगाडा मालक बाळशिराम पायमोडे, सत्यम निमसे, दत्तात्रय निवडूंगे, संचालक रावसाहेब बर्वे,अमोल उगले, निलेश भालके, अनिकेत झावरे दत्तात्रय साळुंखे, मनोहर झावरे, डॉ.बाबासाहेब गांगड, बापूसाहेब गायखे भिमाजी गायखे, सुदाम शिर्के, रावसाहेब हिंगडे, बापूसाहेब गायके पोपट दाते, प्रवीण साळुंखे, सुमित औटी, भाऊसाहेब जगदाळे, अरुण चेमटे, जिजाबापू हिंगडे, अंकुश साळुंखे, शुभम गायखे, राहुल गायखे, आदी वासुंदे येथील निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी माझा सत्कार न करता मला शालेय साहित्य भेट द्या, त्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांना होईल असे ते नेहमीच आवाहन करतात. विधानसभा निवडणूकीनंतर कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षे शाळा बंदच होत्या. त्यामुळे आ. लंके यांच्याकडे संकलीत झालेले साहित्य फारसे वितरीत झाले नाही. यंदा मात्र आ. लंके यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करीत असून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही आ. लंके यांच्याविषयी आकर्षण आहे.त्यांनी पाठविलेले शालेय साहित्य हाती पडल्यानंतर हे विद्यार्थी आनंदले.


आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघात शैक्षणिक क्रांती .. गुरुदत्तचे अध्यक्ष बा.ठ.झावरे


आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पुरवुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील बौद्धिक क्षमता ओळखून युपीएससी एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दारे खुले करून व मदतीचा हात देऊन एक शैक्षणिक क्रांती केली असल्याचेही गुरुदत्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे आपल्या पारनेर तालुक्यातील गरजू शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने डिजीटल शाळा हा उपक्रम आमदार निलेश लंकेचा कौस्तुकासपद‌ असल्याचे बा.ठ.झावरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button