संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने कार्यान्वीत करण्यात आलेल्या 1000 वृक्षारोपण व संगोपन उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार दि. 01 जूलै रोजी शहरातील सौ. न. सो. कळसकर प्राथमिक विद्यालयात उत्साहात करण्यात आला.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सोमनाथ तात्याबा कळसकर गुरुजी, कार्याध्यक्ष डॉ. एस.जी. सातपुते, युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, सचिव नंदकिशोर बेल्हेकर, उपाध्यक्ष गणेशलाल बाहेती, डॉ.जी.पी. शेख, रत्नाकर पगारे, कोषाध्यक्ष सुरेश जाजू व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळील उपस्थितांचे स्वागत महासंघाचे उपाध्यक्ष गणेशलाल बाहेती यांनी केले. तर या उपक्रमाविषयी माहिती देताना दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे म्हणाले की,
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. पुढील पिढीसाठी एक सुरक्षा कवच ज्येष्ठ नागरिकांनी तयार करायचे आहे. फक्त वृक्षारोपण करुनच थांबायचे नसुन पाच वर्षे त्याचे संगोपन करायचे आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे असलेले अनुभव आपल्याला या उपक्रमासाठी वापरायचे आहेत.
अध्यक्षीय भाषणात राष्ट्रपती पारिातोषिक विजेते सो. ता. कळसकर गुरुजी म्हणाले की, संगमनेर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी एकत्र येत संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघाची स्थापन केली आहे. या महासंघामध्ये संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ व संघाच्या ग्रामीण भागातील 11 उपशाखा, महेश ज्येष्ठ नागरिक संघ, राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ व ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संस्था, गणेशनगर यांचा समावेश आहे. या सर्वांच्या सहभागाने तयार झालेल्या या महासंघाने अगदी कमी कालावधीत अनेक कामे केलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी फक्त स्वतःकरता न जगता आपल्या पुढील पिढीसाठी, समाजसेवेसाठी काहीतरी करायला पाहिजे हा उद्देश घेऊन सध्या होत असलेला पर्यावरणाचा र्हास, पावसाचे कमी प्रमाण यावर असलेला पर्याय म्हणजे वृक्षारोपण. त्यासाठी महासंघाने 1000 वृक्षारोपण करुन त्यांचे पाच वर्षे संगोपन करण्याचा संकल्प केला आणि आज या संकल्पाचा शुभारंभ आपण केलेला आहे. आजपासून या उपक्रमाची खर्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आपण सर्वजण चिकाटीने तरुणांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी करणार आहोत. याप्रसंगी कळसकर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास डी.बी. राठी सर, चारुदत्त काटकर, डॉ. जी.पी.शेख, जयप्रकाश लाहोटी, प्रा. ज्ञानेश्वर गोंटे, श्रीमती मंगला पाराशर, नंदककिशोर बेल्हेकर, रावसाहेब पारासुर, विठ्ठल रहाणे, काशिनाथ हांडे, अर्जुन वाघ, रत्नाकर पगारे, एकनाथ गुंजाळ, नारायण उगले, शंकर काशीद, भाऊसाहेब मांडे, सुश जाजू, केदारनाथ तापेड, विजयकुमार भुतडा, द. सा. रसाळ, कळसकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पानसरे , श्रीमती सातपुते , श्री. कासार, श्री.वडीतके , श्री.घाडगे आदी उपस्थित होते.