अगस्ती आश्रम पायी दिंडीत मोफत आरोग्य सेवा

अकोले प्रतिनिधी
श्री अगस्ती महाराजांचा पालखी सोहळा १२ व्या वर्षी पंढरपूर कडे प्रस्थान ठेवत असताना सर्वजण आपापल्या परीने वारकऱ्यांची सेवा करताना दिसतात
. विविध अन्नदात्यांनी आपल्या परीने अन्नदान ,चहा, नाश्त्याची व्यवस्था तसेच प्रवासामध्ये पावसापासून संरक्षण होण्याकरता संगमनेर येथील मंडलिक परीवाराने प्लॅस्टिकच्या घोंगटे ची व्यवस्था केली. वारकऱ्यांच्या प्रवासाकरता रोहिदास भांगरे व पाडुरंग गीते यांनी टॅंकर, ट्रक अल्प दरात उपलब्ध करून दिली तर कुंभेफळ येथील पंढरीनाथ कोटकर यांनी रथाची बैल जोडी तर भांगरे व कोतवाल हे चारा व्यवस्था करतात. ज्ञानेश्वर भांगरे यांनी अश्व व्यवस्था अशा सर्वतोपरी सहकार्य केले
तालुक्यातील अनेक दानशूर लोक मदत करत असतात. त्यातच पायी चालून वारकरी थकतात, पायांना फोड येतात, हात पाय दुखतात अशावेळी सर्वांना अनेकांना वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी वारकऱ्यांची अतिशय निष्ठेने आरोग्य सेवा देण्याकरता डाॅ.प्रकाश वाकचौरे ,डॉ.दर्शन बंगाळ डॉ रुपाली बंगाळ डॉ. घनकुटे ,कृष्णा साबळे व धनंजय वाकचौरे यांनी येऊन वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली औषधोपचार केला त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुलभ होऊन आनंदमय वातावरण होते सर्व डॉक्टरांनी काही काळ पालखीत पायी चालून वारीचा आनंद घेतला व वारकऱ्यांची सेवा केल्याचा व त्यांच्या प्रवासातील त्यांचं दुःख हलकं केल्याचं वेगळं समाधान व आनंद डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
यानंतरही प्रतिवर्षी येऊन वारकऱ्यांची सेवा करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चापडगाव जामखेड मुक्कामी डाॅ. सौ व श्री बेलोसे हे भंडारदरा येथून दुरचा प्रवास करून वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्याकरता आले सर्वांवर उपचार करून रात्री कीर्तन श्रवण व दिंडीत भोजन प्रसादाचा आनंद घेतला वारकऱ्यांवर औषधोपचार करताना वैद्यकीय शिक्षण घेत असताना पाच वर्ष केलेल्या वारीतील औषधोपचाराची आठवण त्यांना झाली व पुन्हा एकदा प्रतिवर्षी वारकऱ्यांची सेवा करण्याचा आनंद घेता यावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राजेन्द्र महाराज नवले,विश्वस्त दिपक महाराज देशमुख, युवा किर्तनकार गणेश महाराज वाकचौरे, विनेश देशमुख हे उपस्थित होते पालखीच्या वतीने सर्व डाॅक्टरांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
