इतर

गायकर म्हणाले अगस्ती साठी अनेक खस्ता खाल्या …


प्रसंगी ताकद पणाला लावू पण 

 अगस्ती बंद पडू देणार  नाही
 — सीताराम पाटील गायकर

कोतुळ प्रतिनिधी


आदरणीय शरद पवार व  अजित दादा  पवारांमुळे अकोले तालुक्याचा पाणीप्रश्न सुटला   निळवंडे धरण, निळवंडे कालवे  , पिंपळगाव खांड धरण  झाले  अजितदादानी धरण केले नसते तर  आज तालुक्यात एवढा ऊस उभा राहिला नसता   बागायत क्षेत्र वाढल्याने अगस्तीला कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध झाला  अगस्ती कारखान्या   मुळे अकोले तालुक्यातील हजारो शेतकरी, कामगार व्यापारी ,सर्वसामान्यांचे, प्रपंच उभे राहिले कारखाना त्यागातून आणि अनेक   अडचणीतून उभा राहिला सुरवातीला  कारखाना  उभारणीत   प्रवर्तक मंडळात  असताना मी रात्र दिवस झटलो स्लॅब वर झोपलो  ,  कारखाना उभा केला  नंतर च्या काळही   अडचणी आल्या      जिल्हा बॅँक व तालुक्यातील पतसंस्थांच्या कडून संचालक ,व कर्मचारी यांचे नावावर कर्ज काढून  कारखाना चालविला     ४० वर्षे मला तालुक्यात जनतेची सेवा  करता आली अगस्ती कारखाना अनेक अडचणीतून उभा केला अनेक  खस्ता खाल्ल्या यामुळे अगस्ती कधीच बंद पडू देणार नाही त्यासाठी  ताकद पणाला लावू परंतु अगस्ती मोडू देणार नाही

आदिवासी- बिगर आदिवासी असे भेदभावाचे राजकारण  न करता अगस्तीच्या सभासदांना  न्याय देऊ असा विश्वास अगस्तीचे  व्हाईस चेअरमन  सिताराम गायकर यांनी व्यक्त केला

 अगस्ती साखर कारखाना निवडणुक प्रचारार्थ शेतकरी समृद्धी मंडळाचा  मेळावा कोतुळ येथे  आयोजित केला होता यावेळी ते बोलत होतेअध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते शंकरराव देशमुख होते
जेष्ठ नेते अशोकराव भांगरे यावेळी म्हणाले कि २०१७ ला व २०१९ ला  तालुक्यात  एकी दाखविली आता कारखान्याला एकी झाली आहे कारखाना वाचविण्या साठी  हिं संधीं  आली आहे      विरोधकांकडे कडे कारखाना असताना पिचडांनी कारखान्याला कर्ज देऊन नका असे पत्र देऊन कारखाना  अडचणीत आणण्याचे पाप केले   अकोले  कॉलेज ,अगस्ती कारखाना  यशवंत भांगरे, दादासाहेब रुपवते यांनी  उभा केला पण त्यांची जाणीव  ठेवली नाही तुम्हाला १५ वर्ष कारखान्यात बिनविरोध दिले मात्र तुम्ही फक्त स्वार्था साठी त्याचा उपयोग केला पंधरा वर्षात आदिवासींना कमी दराने कधी साखर दिली नाही कारखान्यावर तुम्ही बोलत नाही  तर  मोदींने गहू आणि तांदूळ दिले हे सांगत आहे   अशी टीका भांगरे यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे वर केली

तालुक्यातील ऊस गाळप 4 लाखावरून  6 लाख मे टना पर्यंत नेण्याचे  धोरण शेतकरी समृद्धी मंडळाने घेतले आहे तालुक्यात 10 हजार हेकटर क्षेत्र बागायती करण्याचा प्रयत्न करून  असा विश्वास अशोक भांगरे यांनी व्यक्त केला

मधुकर नवले म्हणाले की आपल्या राजकारणाची भूक भागविण्यासाठी  समोरची मंडळी तालुक्याचे इतिहासाला न शोभणारे वर्तन करून आपण कसे मोठे  आहोत हे भासवीत आहे कारखाण्यावर न  बोलता व्यक्तिगत टीका करत आहे ज्यांचे कडे कर्तृत्व आणि मर्दुमकी नाही असे लोक टीका करताना दिसत आहे    जालिंदर वाकचौरे ,  शिवाजी धुमाळ, मधुकर पिचड यांनीही  पतसंस्थांच्या कर्जाचा लाभ घेतला तेच आज पतसंस्थांच्या चौकशीची भाषा करत पतसंस्थांची बदनामी करत आहे पतसंस्थांमुळे अनेकांचे  प्रपंच उभे राहिले   मात्र राजकीय दहशत निर्माण करण्यासाठी घाणेरडे राजकारण करत आहे  असा आरोप मधुकर नवले यांनी केला 

, ,अशोक देशमुख  चंद्रकांत सरोदे ,नेताजी आरोटे  भाऊसाहेब बराटे,  सदाशिव साबळे   भाऊसाहेब हाडवळे  ,,शांताराम वाळुंज ,आदींनी मनोगत व्यक्त केले

यावेळी  मिनानाथ पांडे, यमाजी लहामटे ,रामनाथ बापूं वाकचौरे ,   किसनराव हांडे,   बाळासाहेब देशमुख  ,सयाजीराव देशमुख आरपीआय चे विजयराव वाकचौरे , प्रमोद मंडलिक, मच्छिद्र धुमाळ

किसनराव पोखरकर ,महेश नवले ,कोतुळचे सरपंच भास्कर लोहकरे ,उप सरपंच संजय देशमुख राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे  बाळासाहेब ताजणे, दिलीप  मंडलीक प्रकाश  मालुंजकर,  , रघुनाथ साबळे , प्रताप देशमुख ,संजय साबळे, ,  आदी व्यासपीठावर उपस्थित होते  कोतूळ व मुळा परिसरातील शेतकरी उपस्थित होते  मानले रवींद्र आरोटे  यांनी सूत्रसंचालन केले तर दिलीप देशमुख यांनी आभारमानले

 

वसंतराव मनकर म्हणाले की आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी अडीच वर्षात  विकासकामांसाठी सर्वाधिक निधी आणून यापूर्वीच्या आमदारांचा विक्रम मोडला तालुक्यात परिवर्तन झाल्यामुळे घडले आता सहकारी संस्थांमध्ये परिवर्तन करा असे आवाहन केले

 डॉ अजित नवले  – म्हणाले की पिचड साहेब आता तुम्ही थांबून घ्या इथे  कारखान्यात कामाचा धबडगा फार मोठा आहे 24 तास काम करावे लागते आता तुम्हाला ते काम पेलवणार नाही तुम्ही आता थांबून घ्या असा सल्ला डॉक्टर अजित नवले यांनी दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button