मांडव्य ऋषी पायी दिंडीचे स्वागत!

भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने स्वागत
पारनेर प्रतिनिधी :
वडगाव सावताळ येथील मा. सरपंच भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने अहमदनगर या ठिकाणी पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील मांडव्य ऋषी पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले
यावेळी भाऊसाहेब शिंदे हे उपस्थित होते.
मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी राहण्याची व जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मांडवे खुर्द येथून दरवर्षी मांडव्य ऋषी पायी दिंडी सोहळा हा जात असतो ही परंपरा गेली अनेक वर्षापासून जपली जात आहे. दरवर्षी अहमदनगर या ठिकाणी भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात येते.
अहमदनगर शहरातील जाधव लोन या ठिकाणी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले यावेळी भव्य मिरवणूक भजन गात फुगड्या लेझीम असे विविध खेळ यावेळी मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये पार पडली ग्रामस्थ लहान मुले महिला स्थानिक शहरातील नागरिक या भव्य स्वागत दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते वडगाव सावताळ चे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे म्हणाले की दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी दिंडी सोहळ्याचे स्वागत करतो वारकऱ्यांची सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा असून ईश्वर भक्ती माणसाचे मन शांत संयमी बनवते विठ्ठलाच्या भक्तीने मन खरे अर्थाने प्रसन्न होते.
या ठिकाणी वारकऱ्यांसाठी दरवर्षी राहण्याची जेवणाची व्यवस्था तसेच वारीच्या दरम्यान त्यांना गरजेचे असलेल्या वस्तूंचे ही आम्ही वाटप करत असतो.
मांडवे खुर्द येथील मांडव्य ऋषी दिंडी सोहळा हा पारनेर तालुक्यातील एक मोठा दिंडी सोहळा असून यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणे सहभागी होतो पायी चालत जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर जे सुख समाधान मिळते ते कशातच नसल्याचेही यावेळी भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितले. यावेळी वडगाव सावताळ टाकळी ढोकेश्वर मांडवे खुर्द वासुंदे तसेच अहमदनगर शहरातील स्थानिक ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे मित्रमंडळाचे कार्यकर्ते ही यावेळी उपस्थित होते खऱ्या अर्थाने वारकऱ्यांची सेवा मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली.