वाढदिवसाच्या निमित्ताने आई -वडिलांना पंढरपूर वारी

सोनई–आज समाजात मनुष्य आपला वाढदिवस साजरा करताना हजारो रुपये खर्च करतात, डामडौल करतात,स्टंट करतात,मित्र मंडळी बाहेर खर्च करतात,असा अवाढव्य फालतू आर्थिक खर्च,करून वेळ वाया घालवतात,पण चक्क एका माजी सरपंच यांनी ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या जन्म दात्याना विधात्याचे दर्शन म्हणुन पंढरपूर, तुळजापुरचे दर्शन घडवले
. वाढदिवस साजरा होणार त्यावेळी मित्रमंडळी,पाहुणे याना आपण महत्व देतो पण बेल्हेकर यानी ज्यांनी जन्म दिला त्याना या विधात्याचे दर्शन घडवले .. त्या विधात्याचे चरणस्पर्श आई वडिलाचे घडवुन आणले.
नेवासा तालुक्यातील बेल्हेकर वाडी येथील आदर्श सरपंच पुरस्कार कर्ते भरत बेल्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या आई-वडील यांना घेऊन पंढरपूर व तुळजापूर देवीचे दर्शन घडवून आणले आणि एक विठ्ठल रुख्मिनी आत्मिक पुण्य मिळवले, खरं तर त्त्यानी आपल्या आई वडिलात विठ्ठल रुक्मिणी पाहीली. आणि एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला. बहुतेक ठिकाणी ज्यानी हे विश्व दाखवले ते आई वडील च वाढदिवसाला नसतात… पण येथे बेल्हेकर यानी आपला जन्म दिवस आई वडीला समवेत एक विधायक कार्य करून घालवला. एक मनाला समाधान लाभले,असे भावनिक मत भ्रमण द्वारे व्यक्त केले.
त्यांच्या समवेत पत्नी विशाखा बेल्हेकर, आई सुभद्रा बाई,वडील मच्छिंद्र बेल्हेकर हे पायी चालत आलेल्या पालखीचे दर्शन चाही लाभ घेत आहेत. अशीही पंढरीची वारी वाढदिवसाच्या निमित्ताने आगळा वेगळा क्षण आदर्श सरपंच भरत बेल्हेकर यांनी अनुभवला.