खडकवाडी सेवा संस्थेचे अध्यक्षपदी विश्वनाथ ढोकळे तर उपाध्यक्षपदी संजय शिंगोटे

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समाजांना खडकवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विश्वनाथ भागुजी ढोकळे उपाध्यक्षपदी संजय कुंडलिक शिंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पारनेरच्या सहाय्यक निबंध कार्यालयाचे आर.बी.वाघमोडे वसचिव नवनाथ बिचारे यांनी काम पाहिले.या विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विश्वनाथ ढोकळे यांची बिनविरोध निवड करण्यात यावी अशी सुचना संचालक मारुती आग्रे यांनी मांडली व त्यास अनुमोदन संचालक संजय कर्नावट यांनी दिली आहे.तर उपाध्यक्षपदी संजय कुंडलिक शिंगोटे यांच्या नावाची सूचना बाबासाहेब गागरे यांनी मांडली तर त्यास अनुमोदन आत्माराम पांडुरंग यांनी दिले.
या निवडीवेळी सेवा संस्थेचे संचालक मारुती आग्रे आत्माराम गागरे विश्वनाथ ढोकळे बाळासाहेब बिचारे संजय शिंगोटे संजय कर्नावट संतोष ढोकळे बाबासाहेब गागरे व निलेश शिंदे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. या पदाधिकारी निवडी दरम्यान अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली असून खडकवाडी सारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सेवा संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष विश्वनाथ ढोकळे यांनी सांगितले.तर भविष्यात या सेवसंस्थेच्या माध्यमातून सभासद हिताचे निर्णय यापुढील काळात घेण्यात येणार असून खडकवाडी पट्ट्यातील आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे नूतन अध्यक्ष विश्वनाथ ढोकळे तर उपाध्यक्ष संजय शिंगोटे यांनी सांगितले आहे. खेळणीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अरबी वाघमोडे व सचिव नवनाथ बिचारे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले.