इतर

टाकळी ढोकेश्वर येथे बालवारकरी दिंडी सोहळा

पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील बनाईवस्ती दि. ७ जुलै रोजी जि.प. प्रा. शाळा येथे बालदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. बालवारकऱ्यांनी पारंपारिक वेशभुषा केली होती. बालविठठल, बालरुक्माई , बालवारकरी , अशा सुंदर वेशभूषेत प्रबोधनपर घोषणा मुलांनी दिल्या. या दिंडी सोहळ्यास सर्व माता पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले.

बनाईमाता मंदिरात बालविठ्ठल – रुक्माईचे पूजन पार पडले. टाकळी ढोकेश्वर सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन नारायण झावरे व व्हा. चेअरमन मोहनराव रांधवन यांचा चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

आनंद झावरे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनी वाढदिवसानिमित्त शालेय परिसरात रंगीत सिमेंट ठोकळे देणगीरुपाने जाहीर केले.
यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित व्हा. चेअरमन मोहन रांधवन बोलताना म्हणाले की बनाई वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन करून खऱ्या अर्थाने मुलांवर तुकोबांची व ज्ञानोबांची परंपरा जपली जात असून अशा पद्धतीचे सामाजिक ऐतिहासिक व सांस्कृतिक उपक्रम घेऊन खऱ्या अर्थाने मुलांच्या बाह्य ज्ञानामध्ये भर पडत असते बनाईवस्ती शाळा व्यवस्थापन समिती नेहमीच असे उपक्रम घेऊन मुलांना प्रोत्साहित करते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पप्पू पायमोडे, गणेश इघे यांनी सर्व बालदिंडीस फलाहार व नाश्ता दिला. अत्यंत उत्साहाने विदयार्थ्यांनी अभंग, कविता,वृक्षारोपनाचे महत्व गायनातून प्रबोधित केले. याप्रसंगी अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे, ह.भ.प. बाळकृष्ण शेळके महाराज, सचिन बांडे, सोमनाथ बांडे, बंडूशेठ रांधवन, किरण धुमाळ, मुख्याध्यापक व शिक्षक रुंद तसेच सर्व माता पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button