इतर

लासलगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव

नाशिक लासलगाव आज दिनांक१३/१०/२०२४ रोजी भारतीय बौद्ध महासभा लासलगाव शहर शाखा यशोधरा व रमाई महीला मंडळ तसेच विवीध सामाजिक धार्मिक राजकीय परिवर्तन वादी आंबेडकरी संघटना यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या ऊस्ताहात संपन्न झाला सदर प्रसंगी बि के पगारे,भाऊसाहेब रत्नपारखे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून सामुहीक धम्म वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले धम्मचक्र प्रवर्तन दिना निम्मीत प्रा जालींदर बगाडे ,डॉ अमोल शेजवळ, वंचीत बहुजन आघाडीच्या भारतीताई शेजवळ यांनी मनोगत व्यक्त करून हार्दिक शुभेच्छा दिल्या कवि गायक नीवृती संसारे यांनी गीत सादर करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली
कार्यक्रमास नाना बनसोडे, अशोक गायकवाड़, रमेश कर्डक, भोलाकाका पवार, भास्कर शेजवळ, सागर आहिरे बाळासाहेब सोनवने, साहेबराव केदारे, रमेश पगारे, नाना सूर्यवंशी,राहुल पवार, करण विस्ते ,केदारे मेजर,अविनाश पगारे, , विठल निळे, शाम साळवे, बाजीराव केदारे राजेद्र बच्छाव ,महिला मडळाच्या तुळसाताई शेजवळ, सुशिला शेजवळ, सुशिला गायकवाड़ प्रीती शेजवळ माया केदारे, कांचन साळवे,संध्या निरभवने, प्राज्ञा शेजवळ रेखा गायकवाड़ शिलाताई आहिरे, छाया पगारे , ज्योती केदारे आदी धम्म बांधव मोठ्या प्रमाणावर ऊपस्थीत होतें कार्यक्रमाच्या शेवटी भव्य खिरदांन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button