अकोल्यात सेवा सोसायट्यां ची कर्ज वसुली 97 टक्के

जिल्ह्यात दुसरा क्रमांक
अकोले प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर च्या अकोले कार्यालयाने यावर्षीही कर्ज वसुली मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे
. जिल्हा बँक व तालुक्याती ल विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱयांना पीक कर्ज वाटप केले जाते तालुका विकास अधिकारी कार्यालया मार्फत यावर नियंत्रण ठेवले जाते या कार्यालयाने कर्ज वसुली ची यशस्वीतेची परंपराकायम राखली
वसुलास पात्र कर्ज १८०५६.५५ असुन ते वसुल रक्कम १७५४९.५० ने करीत जिल्ह्यात वसुलीची टक्केवारी ९७.१९% केली आहे. व जिल्ह्यात २ क्रमांक मिळवला आहे.
तालुक्यात एकुण ८६ सोसायट्या असुन १२ सोसायट्या व २ बँक शाखा ह्या १००% मेंबर पातळीवर वसुल झाल्या आहे. तसेच ७५ सोसायट्या व १४ बँक शाखा बँक पातळीवर वसुली झाल्या आहे.त्यातील मेंबर वसुल झालेल्या संस्था कळस खुर्द, रेडे,उंचखडक खुर्द, हिवरगाव, डोंगरगाव,आंबड,धामणगाव आवारी,विठे,निब्रळ-निळवंडे, केळी-रुम्हणवाडी,मवेशी,चितळवेढे आहे. यशाची उज्वल परंपरा राखत आदीवासी भाग असुनही शेतकर्यांचा बँकेवरील विश्वास व यशाची परंपरा कायम राखली आहे. कर्ज वसुली साठी सातत्याने प्रबोधन व मार्गदर्शन जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके, व्हा.चेअरमन माधवराव कानवडे,जेष्ठ संचालक सिताराम गायकर,संचालक मधुकर नवले,संचालक अमित भांगरे,कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे व वसुली विभागाचे मँनेजर जयसिंग देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वसुली साठी विशेष कार्य करणारे सर्व शेतकरी कर्जदार सभासदांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्व सोसायटी चेअरमन,संचालक मंडळ, सचिव यांचे तालुका विकास अधिकारी के.एल.देशमुख, विशेष वसुली अधिकारी एस.एम.कर्पे, कार्यालय अधिक्षक एस.बी.भांडकोळी साहेब,इनेस्पेक्टींग ऑफिसर भारत वाकचौरे तालुका सचिव आंबादास दातीर तसेच सर्व सोसायटी चेअरमन, सचिव यांचे कामाचे कौतुक होत आहे..