कडूस सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र करंजुले ,व्हाइस चेअरमनपदी गौतम जाधव यांची निवड.

दत्ता ठुबे/पारनेर-प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील कडूस विकास सेवा सहकारी संस्थेवर माजी पंचायत समिती सदस्य मारूती मुंगसे, दाद मुंगसे, दादा दिवटे,व युवा सरपंच मनोज मुंगसे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली असून संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र बबन करंजुले व्हाइस चेअरमनपदी गौतम जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत चेअरमन पदासाठी राजेंद्र करंजुले तर व्हा. चेअरमन पदासाठी गौतम जाधव यांचे प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या वेळी पॅनल प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य मारुती मुंगसे, दादा मुंगसे, दादा दिवटे,ऍड युवराज पाटील,विद्यमान संचालक शिवाजी बाळू दिवटे,संजय महादेव रावडे, बबन कोंडीबा दिवटे (बि.के.दिवटे), दिपक नामदेव करंजुले, विश्वनाथ दौलत मदने यांचा सह मा.चेअरमन भास्करराव मुंगसे, दिलीप लक्ष्मण मुंगसे ,जितेंद्र रावडे , मा.सरपंच मच्छिंद्र नरवडे ,मा.सरपंच भगवानराव दिवटे , मा. चेअरमन संदिपराव दिवटे, संतोषशेठ गायकवाड, मा.सरपंच बबन करंजुले मेजर, प्रा.करंजुले सर, शा.व्य. समिती अध्यक्ष सुनिल मुंगसे,अध्यक्ष संपत रावडे , संतोष शि.मुंगसे, भागचंद हिवरकर हेमंतराव रणसिंग ,भास्कर रावडे, लहानु रावडे, सोमनाथ काळे,बापूराव करंजुले, प्रसाद लंके , किसनराव गायकवाड , मेजर सुदाम गायकवाड,मेजर बळवंत दिवटे, मेजर हरिचंद्र शिंदे, गणेश मुंगसे ,गणेश शंकर रावडे ,पंडीत नरवडे ,आप्पासाहेब काळे, प्रदीप काळे,सचिन रावडे, शरद लंके पाटील, सुनीलराव कणसे , बापूराव मदने, शंकरराव जाधव, संतोष भा.रावडे, सतीश रायते , फिरोज शेख, रामदास कणसे , बबनराव जाधव, सतीश डवणे, सुहास दादा नरवडे, संतोषशेठ दिवटे, बाळू काका करंजुले,सुदाम नरवडे,बाबासाहेब नरवडे हे उपस्थित होते,