माका ते महालक्ष्मी हिवरे रस्त्यासाठी ग्रामस्थांनी दिला रस्ता रोकोचा इशारा

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
माका ते महालक्ष्मी हिवरे रस्त्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलना चा इशारा दिला आहे याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की नेवासा तालुक्यातील
माका ते महालक्ष्मी हिवरे रस्ता अतिशय खराब झालेले आहे माका, महालक्ष्मी हिवरे, निबेनंदूर, पाचुंदा देडगाव गावातील सर्व ग्रामस्त हे घोडेगाव बाजार तसेच कांदा मार्केट व शनिशिंगणापूर ला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे.
रस्ता मोट्या प्रमाणात खराब झाला आहे त्यामुळे नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ताची ३ कोटी २३ लाखचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली असून त्याला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच महालक्ष्मी हिवरे ते चांदा रस्ताचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर केलेला आहे ही दोन्ही कामे लवकरात लवकर सुरु करावे . अन्यथा आम्ही ग्रामस्त दिनांक १६/१०/२०२३ वार सोमवार रोजी
सकाळी ठीक ०४.०० वा ठिकाण माका येथे रस्ता बंद आंदोलन करणार असल्याचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी म्हटले आहे निवेदनाच्या प्रति तहसीलदार बांधकाम विभाग याना डल्या आहे