कुकाण्यातील जातीय सलोखा कौतुकास्पद – पोलिस निरीक्षक विजय करे

दत्तात्रय शिंदे/माका प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी
न करता दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय तसेच हिंदू बांधवांना फराळ व खिचडी वाटप हा मुस्लिम समाजाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी केले.
कुकाणा पोलिस चौकीसमोर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पुढच्या काळात
परस्परांनी एकमेकांच्या धर्माविषयी आदरभाव ठेवून जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा असा आशावाद व्यक्त केला. यावेळी मौलाना शमशाद पठाण,युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अब्दुल हाफिज शेख यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक प्रा. ईस्माइल शेख यांनी
केले.कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रज्जाकशहा ईनामदार, सरपंच विठ्ठल अभंग,मा.सरपंच दौलत देशमुख, उपसरपंच सोमनाथ कचरे,भाऊसाहेब फोलाणे, मा. सरपंच एकनाथ कावरे, सादीक शहा, सलिम इनामदार, सुयोग लान्सचे मुसा ईनामदार, अहमद ईनामदार, मा. सरपंच
रऊफभाई तांबोळी,मतीन ईनामदार, ग्रामपंचायत सदस्य ईकबाल ईनामदार, सुनिल गोर्डे, हनिफ शहा, आरीफ तांबोळी, समीर मुजावर, इन्नुस नालबंद, समीर पठाण, लालखा पठाण, रसुल ईनामदार, मुन्ना ईनामदार, कदिर नालबंद, ईसाक शहा, मुन्ना शेख,, पत्रकार नबाब शहा, पत्रकार समीर शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित
होते. प्रारंभी सकाळी ईदगाह मैदानावर मौलाना शमशाद पठाण यांन नमाज अदा केली तर मौलाना इम्रान शेख यांनी खुदबा पठण केले पावसाची रिमझिम असतांना देखील मुस्लिम म बांधवांनी नमाज अदा केली