अगस्ती च्या कामगारांची आरोग्य तपासनी

अकोले प्रतिनिधी-
आरोग्य तपासणी ही काळाची गरज असून प्रत्येकाने आरोग्य तपासणी करून घ्यावी असे प्रतिपादन अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी केले. अगस्ती सह.साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र,म्हाळादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने मजूर,कामगार, कर्मचाऱ्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी अजित देशमुख हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी चीफ इंजिनिअर रमेश पुंडे,रसायन विभाग प्रमुख सहाणे,अगस्ति संघाचे व्यवस्थापक उल्हास देशमुख,कामगार अधिकारी गणेश आवारी,वाहन विभाग प्रमुख बाळासाहेब शेटे,स्थापत्य अभियंता प्रकाश देशमुख, खरेदी अधिकारी दत्तात्रय आवारी,भांडरपाल कोंडीबा पवार,टाईमकिपर नामदेव शेटे,सुरक्षाधिकारी दिलीपराव देशमुख, विश्वास ढगे,वैद्यकीय अधिकारी डॉ.तांबोळी याचेसह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक सहकारी,शिक्षक ,कामगार, कर्मचारीवर्ग उपस्थित होते. यावेळी मुख्य लेखापाल एकनाथ शेळके,वैद्यकीय अधिकारी डॉ.श्यामकांत शेटे यांनी उपस्थितीतांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.स्वागत व प्रास्ताविक केन मॅनेजर सायजीराव पोखरकर यांनी केले .सुत्र संचालन बाळासाहेब कुमकर यांनी केले.व आभार शेतकी अधिकारी सोमनाथ देशमुख यांनी केले