इतर
दर्पण रत्न पुरस्काराने गोरक्ष नेहे सन्मानित

संगमनेर प्रतिनिधी
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅदमी मुंबई या संस्थेच्या वतीने संगमनेर येथील दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी गोरक्षनाथ नेहे यांना राज्यस्तरीय आदर्श दर्पण पत्रकारिता पुरस्कार प्रदान करन्यात आला. नाशिक येथील औरंगाबादकर सभागृहात आंध्रप्रदेशातील इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. सानी पीनाराव राव यांच्या शुभहस्ते गोरक्षनाथ नेहे यांना दर्पण रत्न आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संगमनेर पत्रकार मंचचे ते उपाध्यक्ष आहेत. नेहे यांनी पत्रकरीतेच्या माध्यमातून अनेक विषयाला वाचा फोडली. गेली 15 वर्ष नेहे पत्रकारितेत कार्यरत आहेत.