पारनेर तालुक्यातील प्रती पंढरपूर पळशी येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त पारनेर तालुक्यातील प्रती पंढरपूर पळशी येथे श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्ये सुजित झावरे पाटील यांचे हस्ते महाआरती व पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी सुजित झावरे पाटील “श्री विठू रायाकडे सर्वांना सुख, समाधान, शांती लाभो, यावर्षी पाऊस चांगल पडावा, माझ्या शेतकरी राजाला चांगले दिवस येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना”.
सुजित झावरे पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना जिल्हा नियोजन अंतर्गत “क” वर्ग दर्जा प्राप्त करून दिले. गेले १२ वर्षा पासून सालाबाद प्रमाणे देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने श्री.विठ्ठल राही रुख्मिणीची महा आरती व पूजा यांच्या शुभहस्ते करण्यात येत आहे. यावर्षी ही पूजेचा मान सुजित झावरे पाटील यांना देण्यात आले. सुजित झावरे पाटील यांची अपार श्रद्धा असून काही दिवसापूर्वी सुजित झावरे पाटील यांनी श्री.विठ्ठल राही रुख्मिणी मूर्तीसाठी चांदीचे मुकुट अर्पण केले. तसेच जिल्हा परिषदेचे माध्यमातून जिल्हा परिषद तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सभामंडप, भक्त निवास, पेव्हींग ब्लॉक बसविणे, तसेच परिसर सुशोभीकरण करणे इ. विकास कामासाठी आतापर्यंत ७५.०० लक्ष रु. निधी उपलब्ध करून देण्यात आले. यापुढे ही सदर मंदिरासाठी निधी देणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
यावेळी मा. सरपंच मिठू शेठ शिंदे मंदिराचे प्रमुख आण्णा काका पोळ, पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, महेश पाटील ढुस, सरपंच सुमनताई सैद, भाऊसाहेब सैद, दिलिपराव पाटोळे, बा. ठ. झावरे, भागूजी दादा झावरे, मधुकर बर्वे सर, मा.सरपंच संतोष जाधव, मोढवे सर, भास्कर शिंदे, दिपक गुंजाळ, ऋषिकेश गागरे, शिवाजी शिंगोटे, बंसी गागरे, बापू काळणर, महादू पठारे, भाऊ पाटील गागरे , विकास गांधी, संतोष सुडके, रवी शिंदे भूषण मोढवे, भाऊसाहेब मोढवे, कारभारी शिंदे, उमा हरी मोढवे तसेच तालुक्यातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
