पाथरे बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात ५ शेळ्या ठार!

राहता दि११- राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील सिताराम भिमराज कडू यांच्या पाच शेळ्या बिबट्याने ठार केल्या.
आज मंगळवार दि.१२/७/३०२२रोजी पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्या शेळ्यांच्या गोठ्यात शिरून सिताराम कडू यांच्या पाच शेळ्या ठार केल्या. गोठ्यातून शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून सिताराम कडु गोठ्याकडे गेले असता त्यांना एक बिबट्या व दोन पिल्ले दिसले त्यांनी आरडाओरड करून शेजारचे जागे केले व बिबट्याला हाकलून लावले. तोपर्यंत बिबट्याने त्यांच्या पाच शेळ्या ठार केल्या होत्या.
त्यांनी लगेच वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी कोपरगावचे वनपरीक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील, वनपाल बी. एस. गाढे. यांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच वनरक्षक संजय साखरे घटनास्थळी पोहोचले.
सदर कुटुंब हे शेतकरी असुन त्यांचे सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसाय व शेळीपालन यावर अवलंबून आहे.यावेळी परिसरातील अनेक नागरिक जमा झाले होते व वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी त्यांनी केली
यावेळी विष्णु कडू, रामराव कडू, अशोक कडू, रमेश कडू, भानुदास कडू, पोपट कडू, निलेश ब्रम्हणे, प्रशांत कडू, पत्रकार अनिल वाघचौरे वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के हजर होते.