कोतुळ येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

अब्दुल कलाम यांचे देशासाठी मोठे योगदान –
राजेंद्र पाटील देशमुख
कोतुळ प्रतिनिधी
कोतूळ (तालुका अकोले) येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला
कोतुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी थोर शास्त्रज्ञ डॉ.ए पीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
15 ऑकटोबर 2023 रोजी ला माजी राष्ट्रपति आणि वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती निमित्ताने महाराष्ट्रामध्ये हा दिवस वाचन प्रेरणा दिवस साजरा होत आहे

सर्व शाळांमध्ये हा दिवस वाचन प्रेरणा दिवस साजरा करून , राज्याच्या शाळा आणि कॉलेजांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जात असून एपीजे अब्दुल कलाम यांचे देशासाठी मोठे योगदान असल्याचे यावेळी भाजपाचे युवा नेते राजेंद्र पाटील देशमुख यांनी सांगितले
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर लोहकरे ,उपसरपंच संजय देशमुख इंजिनिअर सुभाष देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी जालिंदर वाकचौरे होमगार्ड श्री साळवे आदी उपस्थित होते