पारनेर तालुक्यात धान्य पुरवठा सुरळीत करा-सुनील वराळ

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी,
संपूर्ण पारनेर तालुका ठीक ठिकाणी सतत अन्नधान्य पुरवठा उशिराने होत असल्याने. तालुक्यातील अनेक कार्ड धारकांना तीन महिने झाले, तरी रेशन वाटप झाले नसल्याची परिस्थिती. आहे रेशन दुकानदारांनी पैसे जमा करूनही पुरवठा विभागाकडून धान्य वेळेत मिळत नसल्याचे रेशन दुकानदारांच्या तक्रारी आहे.
मागील तीन महिन्यापासून ,गरीब कष्टकरी, होतकरू,यांना शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य मिळालेच नाही .अखेर हे धान्य गेले कुठे? असा सवाल शिधापत्रिकाधारक यांनी केला असून . शिघापत्रिका कार्डधारक यांनाअन्नधान्यपुरवठा सुरळीतपणे करावाअशी मागणी सुनिल वराळ यांनींकेली आहे
धान्य पूरवट्यावरून कार्डधारक व रेशन दुकानदार यांच्यात वेळोवेळी वादही निर्माण झाले आहेत.शिधापत्रिका कार्ड धारक यांच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने दूर करण्यात यावी, यामधून अन्न नागरी पुरवठा विभागाचे कार्य जास्तीत जास्ती लोकाभिमुख असावेअसे
निघोज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनील वराळ यांनी म्हटले आहे . पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार निलेश लंके साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला असून आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष पत्रव्यवहार करून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे केला .यावेळी सेवा सोसायटीचे संचालक, दत्ता लंके, शांताराम लाळगे व संतोष लामखडे उपस्थित होते
निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी पारनेर तालुक्याचा अन्नधान्य पुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.