अहमदनगर

खारे कर्जुने येथील विहिर खचली; मोठया दुर्घटनेची श्यक्यता

.

प्रियांका प्रशांत शेळके.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने शेती पिकांची मोठी नुकसान झाली आहे त्याचबरोबर घर ,इमारती यांच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहे उशिरा का होईना जोरदार पाऊस झाल्याने तळे, ओढे नाले, विहिरी, तुडुंब भरले आहेत नगर तालुक्यातील खारे कर्जुने गावातही पावसाने अनेक ठिकाणी नुकसानी झाल्या आहेत ग्रामपंचायत हद्दीतील एक जुनी विहीर या पावसात खचली आहे या विहिरीचा अनेक दिवसापासून नागरिक वापर करत आहे यंदाच्या पावसाळ्यात ही विहीर अचानक खचल्याने ती आता धोकादायक बनली आहे

विहीर अचानक खचल्यामुळे त्या विहिरीजवळील रहिवासी असणाऱ्या दलित वस्तीला व ढवळे परिवाराला धोका निर्माण झाला आहे. अनेक गावकरी व शाळकरी मुले या ठिकाणाहून येत – जात असतात व दलित वस्ती मधील लहान मुले व भिल्ल वस्ती मधील लहान मुले याच विहीरीच्या परिसरात खेळत असतात त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हि विहीर जवळजवळ 55 वर्ष जुनी आहे. त्यामुळे अचानक एखादी विपरीत घटना घडून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी या विहिरीचे नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button