महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महीलाश्रम वसतिगृहात संस्कार वर्गाचे उद्घाटन

पुणे दि ११ — . महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेचे महीलाश्रम वसतिगृह व विवेकानंद केंद्र, पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने यापुढे दर रविवारी होणाऱ्या संस्कार वर्गाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले
यावेळी विवेकानंद केंद्रातर्फे सुधा गोहाड, कांचन जोशी, सुहासिनी राणे, पाटील मॅडम, फडके काका व इतर ताई दादा तसेच वसतिगृह प्रमुख सुमन तांबे-यादव, उपप्रमुख पूनम पोटफोडे, मेट्रन्स व ५ वी ते ८वी च्या ३८० मुली उपस्थित होत्या.

संस्कार वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरूवात वसतिगृह प्रमुख सुमन तांबे-यादव यांनी सर्वांचे स्वागत करुन केली. नंतर विवेकानंद केंद्राच्या सुहासिनी ताईने श्लोकाने व ओंकाराने केली.
नंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून संस्कार वर्गाचे उद्घाटन झाले .
विवेकानंद केंद्राच्या पुणे शाखेच्या प्रमुख कांचन जोशी यांनी विवेकानंद केंद्राविषयी व संस्कार वर्ग घेण्याबद्दलचा हेतू. बाबत माहिती दिली.
व नंतर संस्कार वर्ग घेण्यात आला. .