सुजित झावरे पाटील यांची निष्ठावान कार्यकर्त्यांला अनोखी भेट.

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील तिखोल येथील स्व.वसंतराव झावरे पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते, सुजित झावरे पाटील यांचे विश्वासू सहकारी बाजार समितीचे .सभापती श्री.अरुणराव ठाणगे यांना मुलीच्या साखरपुडा प्रसंगी अनोखी भेट सुजित झावरे पाटील यांनी दिली.
श्री.अरुण ठाणगे यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी रस्ता नसल्याने गैरसोय होत सुजित झावरे पाटील यांच्या लक्षात येताच अरुण ठाणगे यांना अनोखी भेट म्हणुन साईनाथ मळा ते तिखोल रस्ता स्वतःहून सदर रस्त्यासाठी निधी मंजूर करुन आज प्रत्यक्षात रस्त्याचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी सुरेशशेठ पठारे, गोरेगावचे सरपंच सुमन तांबे, अमोल साळवे, वडनेर हवेलीचे सरपंच लहूशेठ भालेकर, बाळासाहेब दिघे, पोपटराव झावरे, बाळासाहेब झावरे, बाळासाहेब झावरे पाटील, शिवाजी गंगाराम ठाणगे, नभाजी ठाणगे, नभाजी मंचरे, सोनू मंचरे, पप्पू ठाणगे, अशोक ठाणगे, महेश अनिल ठाणगे, दत्ता ठाणगे, सुभाष ठाणगे, सुभाष कावरे, गौरव ठाणगे, कोंडा ठाणगे, स्वप्नील ठाणगे, सागर ठाणगे, अशोक खराबी तसेच तिखोल व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.