रामचंद्र भोजने यांचा रविवारी अबीतखिंड येथे सन्मान सोहळा
अकोले प्रतिनिधी
बायोगॅस प्रकल्प लाभार्थी शेतकरी श्री रामचंद्र गणपत भोजने यांचा नुकताच नवी दिल्ली येथे देशाचे राष्ट्रपतींकडून सन्मान करण्यात आला , महाराष्ट्रातील अवघ्या दोन शेतकऱ्यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान करण्यात आला यात त्यांचा समावेश होता राष्ट्रपतींच्या सन्मानानंतर श्री रामचंद्र भोजने यांचा आपल्या मातृभूमीत अबीतखिंड येथे अबीतखिंड ग्रामस्थ व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे
रविवार दि. २३/०२/२०१५ रोजी सकाळी ९ ते १२ वा.- जि. प. प्राथमिक शाळा, अबितखिंड येथे हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे
. आमदार डॉ. किरणजी लहामटे अगस्ती साखर कारखाना व्हा चेअरमन श्रीमती सुनिताताई भांगरेपुणे जिल्हा परिषदेची परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. देवराम लांडे माजी आमदार श्री. वैभवराव पिचड लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोतेअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. लकीभाऊ जाधव ,तहसीलदार श्री. सिध्दार्थ मोरे ,पोलीस निरीक्षक श्री. मोहन बोरसे.मा.पोलीस अधिक्षक कोंडीराम पोपेरे, श्री. यमाजी लहामटे गुरुजी श्री. प्रमोददादा मोरे श्रीमती. छायाताई राजपुत गटविकास अधिकारी श्री. अमर माने तालुका कृषी अधिकारी श्री. नितीन गिरी श्री. डॉ. विश्वासराव आरोटे श्रीमती. हेमलताताई मधुकरराव पिचड आदींमान्यवर उपस्थित राहणार आहेत