संगमनेर तालुक्यात साथरोग व किटकजन्य आजार विषयी जनजागृती अभियान!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात मान्सूनपूर्व साथरोग व किटकजन्य आजार विषयी जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली
पावसाळ्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढून किटकजन्य आजार वाढून सर्वसामान्य जनता हिवताप डेंग्यू चिकनगुनिया या तसेच दूषित पाणी, अन्नपदार्थ ,माशी यामुळे जुलाब ,उलटी ,कावीळ, टायफाईड ,कॉलरा या सारख्या आजारांना बळी पडतात
हे सर्व आजार टाळण्यासाठी आजाराचे प्रतिबंधन करण्यासाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग अहमदनगर यांचे मार्फत साथरोग व किटकजन्य आजाराविषयी ची जनजागृती गावोगावी वाड्या-वस्त्यांवर सुरू केली
सर्वेक्षण कार्यक्रम, आरोग्य शिक्षण, डास, आळी करता घरातील भांडी तपासणे, डास,आळी नियंत्रणाच्या उपाययोजना, कोरडा दिवस पाळणे ,पाइपला जाळी बसविणे, ग्रामपंचायत मार्फत तुंबलेल्या गटारी वाहत्या करणे, खड्डे बुजवणे, पंचर दुकानदारास पत्र देणे, परिसर स्वच्छता, याबाबतचे परिपत्रके जनतेस वाटप करण्यात आली आहे
सदर मोहिमे च्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रवींद्र कानडे, तालुकास्तरीय अधिकारी गटविकास अधिकारी श्री अनिल नागणे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश विश्वनाथ घोलप, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजकुमार जराड ,तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री माळी, तालुका आरोग्य सहाय्यक श्री फटांगरे बी आर, आरोग्य सहाय्यक श्री अर्जुन मंडलिक, आरोग्य सहाय्यक श्री विनायक वाडेकर, आरोग्य सेवक श्री काळे आरोग्य सेविका श्रीमती कदम सरला आदी उपस्थित होते