तर या सरकारचा काय उपयोग- अजित दादा पवार

गायकर तुमच्याबरोबर होते तेव्हा चांगले आता साथ सोडली तर वाईट कसे ?
अगस्तीला सर्वतोपरी सहकार्य करू -अजित पवार
अकोले प्रतिनिधी
राज्यात अजून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे लोकांचे जीव जात आहे लोक अडचणीत आहे अशा वेळेस सरकार नसेल तर त्या सरकारचा उपयोग काय असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी लगावला
ते अकोले तालुक्यातील अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी समृद्धी विकास मंडळाच्या प्रचार सभेत बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर किरण लहामटे हे होते

अजित दादा पुढे म्हणाले की राज्यात ठिक ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे काही लोकांचे जीव गेले काही लोक अडचणीत आहेत त्या भागामध्ये पालकमंत्र्यांनी जाऊन जिल्ह्यात जनतेला विश्वास दिला पाहिजे शेवटी अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या माणसाला मदत करणार नसाल तर त्या सरकारकडे दुसरी काय अपेक्षा करायची याचा विचार केला पाहिजे
राज्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ,वसंतदादा पाटील ,वसंतराव नाईक पद्मश्री विखे-पाटील या सगळ्या थोर व्यक्तींनी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागांमध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता सहकारी साखर कारखाने सुरू केली अठ्ठावीस वर्षापूर्वी आपला कारखाना सुरू झाला तरीदेखील आजही आपला कारखाना पूर्णपणे कर्जमुक्त झालेला नाही माझ्या जिल्ह्यात बारामतीच्या परिसरात छत्रपती , माळेगाव , सोमेश्वर हे तीन कारखाने नऊ हजार टणापर्यंत नेले अतिशय उत्तम पद्धतीने चालवतो ऊस उत्पादनासाठी बारामतीच्या विभागातील शेतकऱ्याला जे कष्ट करावे लागते तेच कष्ट

अगस्तीच्या शेतकऱ्याला करावे लागते संस्थेत चांगले मॅनेजमेंटचे लोकांचा मार्गदर्शन असेल तर संस्था चांगली चालू शकते तुम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही आवाहन केल्यानंतर डॉक्टर साहेबांना निवडून दिलं नगर जिल्ह्यामध्ये आशुतोष काळे असेल निलेश लंके असेल रोहित पवार असेल संग्राम जगताप असेल प्राजक्त तनपुरे अशा पद्धतीने अशा अनेक सहकारी मित्रांना निवडून देण्याचे काम तुम्ही केलं आणि संधी दिली त्याच्यातून चांगल्या प्रकारचा निधी देण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुमची जबाबदारी पार पडल्यानंतर या दोन अडीच वर्षांच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अकोले तालुक्याला जवळपास 500 कोटी रुपये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या निधीतुन दिला
ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याच काम या माझ्या साखर उद्योगांनी केले आणि महाराष्ट्राला एक शाश्वत विकासाचा मार्ग म्हणून या साखर उद्योगाकडून पाहिलं जातं अगस्ती कारखाना देखील या वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार उद्याच्या काळामध्ये बनला पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे
शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद पवार साहेब आहेत त्यांनी या साखर उद्योगाला दिशा देण्याचे काम केले हे उद्योग आता ऊर्जानिर्मितीच्या भोवती केंद्रित झालेले आहे त्या दृष्टीकोनातून आपल्याला पुढे जायचंय आपल्याला अगस्ती मध्ये काही नवीन गोष्टी करायच्या आहे पुढच्या काळामध्ये या सहकारी साखर कारखाना मध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला नुसती म साखर करून चालणार नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे बायप्रॉडक्ट त्या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहेत

राज्यातल्या देशाच्या शेती आणि साखर उद्योगाला आश्वासक दिशा देण्याचं काम आदरणीय शरदराव पवार साहेबांनी सातत्याने केले आणि त्यातूनच हा उद्योग पुढे चाललेला आहे कारखान्यावर तुमच्या मुलाबाळांचे शिक्षण लग्नकार्य आणि तुमचा वर्षाचा एकंदरीत कारभार अवलंबून असतो मित्रांनो त्याच्यामुळे ही निवडणूक ही तुमच्या आर्थिक नाडी जोडणारी आहे तुम्ही शांतपणे विचार केला पाहिजे

पुढच्या काळामध्ये सभासदांच्या मालकीचा अगस्ती साखर कारखाना ही माझ्या भागातल्या लोकांची भाग्यलक्ष्मी आहे हे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत बंद करून द्यायची नाही तो व्यवस्थितपणे चालला पाहिजे अगस्ती सुरू ठेवण्याच्या करता सर्वतोपरी सहकार्य करू असे अजितदादा म्हणाले

कारखान्याच्या उभारणीपासून तुम्ही स्वतः चेअरमन होते इतके दिवस गायकर तुमच्याबरोबर राहिले तेव्हा गायकर चांगले होते मात्र तुम्हाला सोडलं तर ते एकदम वाईट कसे असा सवाल करत अजितदादांनी पिचड यांना करत याची कुठे तरी आपण याची नोंद घेतली पाहिजे खरंतर काही लोकांनी वयोमानाप्रमाणे थोडसं बाजूला झालं पाहिजे किती वर्ष आता?
ऐंशी वर्षाच्या पुढे तुमचं वय झालं तरी तुम्हाला मीच पाहिजे असं कसं पाहिजे एवढ्या मोठ्या सभासदांचा हा प्रपंचाचा गाडा पुढे कसा नेणार असा चिमटा दादांनी पिचडां ना घेतला
अजितदादा पवार अकोल्यात आले असता प्रचार सभेकडे जाण्यापूर्वी त्यांनी गेल्या आठ-दहा दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीने आदिवासी भागात झालेल्या नुकसानीची हरिचंद्रगड परिसरात माणिक ओझर ,मवेशी या परिसरातील झालेल्या नुकसानीची आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या समवेत पाहणी केली
अजित दादा पवार यांना स्टेजवर काही प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी नेते दशरथ सावंत जाणार होते परंतु पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सकाळीच ताब्यात घेतले होते यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अजित दादा यांचा गाडीचा ताफा अडवून या घटनेचा निषेध नोंदविला
संस्था चालवत असताना त्याच्यामध्ये सगळे नवे टाकून चालत नाही आणि सगळे जुने टाकून चालत नाही काही अनुभवी संचालक आणि काही नव्या दमाचे लागतात अनुभवी लोकांच्या हाताखाली ते शिकले पाहिजे शेतकरी समृद्धी मंडळात जुन्या नव्यांची चांगली सांगड घातली आहे यामुळे या संचालक मंडळातील ही मंडळी चांगलं कामकाज करतील यावर माझा विश्वास आहे असे दादा म्हणाले

मी पण उपमुख्यमंत्री होतो…..
मी पण उपमुख्यमंत्री होतो असे सांगत अजित दादा पवार यांनी फडणवीसांना चिमटा काढला पवार म्हणाले पिचड यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले की अकोल्यातील ह्या पतसंस्थांची चौकशी करा आणि फडणीसांनी लगेच सहकार विभागाचे सचिव यांना पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले मी उपमुख्यमंत्री होतो परंतु सहकारी संस्थांवर लगेच कधी अशी कारवाई केली नाही
यावेळी आमदार डॉ किरण लहामटे, जेष्ठ नेते सिताराम गायकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे ,कॉम्रेड डॉ. अजित नवले, वसंतराव मानकर, मधुकरराव नवले, युवा नेते अमित भांगरे, , सुरेश नवले ,विनोद हांडे, विजयराव वाकचौरे ,मारुती मेंगाळ, संदीप कडलग ,शांताराम वाळुंज आदींनी मनोगत व्यक्त केले
यावेळी व्यासपीठावर राजेंद्र फाळके, कपिल पवार, कैलासराव वाकचौरे, मारुती मेंगाळ मच्छिंद्र धुमाळ, श्वेताली घोलप, सुनीताताई भांगरे, यमाजी लहामटे, दादापाटील वाकचौरे, भानुदास तिकांडे, विठ्ठलराव चासकर, सोन्याबापू वाकचौरे ,विजयराव वाकचौरे ,सुरेश नवले, ताराचंद म्हस्के, स्वाती शेणकर ,अमित नाईकवाडी ,सुरेश गडाख ,प्रमोद मंडलिक, प्रकाश मालुंजकर, सतीश भांगरे, , कारभारी उगले, शांताराम वाळुंज,चंद्रकांत सरोदे, गुलाबराव शेवाळे, मंदाताई नवले, भाऊ पाटील नवले , सुरेशराव गडाख, आरिफ शेख आदी उपस्थित होते राजेंद्र कुमकर यांनी आभार मानले यावेळी अकोले तालुक्यातील शेतकरी समृद्धी विकास मंडळाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते