अकोले तील शिवाजी कदम यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ, अकोलेचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी कदम यांचे नुकतेच निधन झाले. ते 56 वर्षाचे होते.
अकोले तालुक्यात मराठा समाजाचे संघटन करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे स्थापना केली होती. समशेरपूर येथील गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे.
समशेरपूर येथील स्मशानभूमीत त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राज गवांदे, शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब मुखेकर, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अशोक आवारी, अकोले एज्युकेशन सोसायटीचे सदस्य राहुल बेनके, समशेरपूर सोसायटी चेअरमन सोमनाथ मेंगाळ, अकोले खादी ग्रामउद्योग चेअरमन नितीन बेनके, डॉ सुभाष आरोटे, आदी उपस्थित होते.