आजचे पंचांग व राशिभविष्य दि १६/०७/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २५ शके १९४४
दिनांक :- १६/०७/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति १३:२८,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति १८:१०,
योग :- आयुष्मान समाप्ति २०:४९,
करण :- बव समाप्ति २४:०४,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन(२२:५६नं. कर्क) – पुनर्वसु,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- रवि – कर्क २२:५६,
बुध – कर्क २४:०१,
शुभाशुभ दिवस:- दु. ०१नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:१९ ते १०:५७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४१ ते ०९:१९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:५१ ते ०५:३० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
संकष्ट चतुर्थी (मुंबई चं.उ. २१:५३), रवि कर्क २२:५६, मु. १५ महर्घ, पुण्यकाल सूर्योदय ते सूर्यास्त, घबाड १५:१० नं., भद्रा १३:२८ प., चतुर्थी श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २५ शके १९४४
दिनांक = १६/०७/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
सकारात्मक उर्जेने काम करावे. कौटुंबिक पाठिंबा मिळेल. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी.
वृषभ
संयमाची गरज भासेल. अडचणीतून मार्ग काढता येईल. समोरील गोष्टींचा आनंद घ्याल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. अनावश्यक खर्च टाळावेत.
मिथुन
बोलतांना संयम राखावा. मनातील चुकीचे विचार बदलून टाका. कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलावीत. आत्मविश्वास कायम ठेवा. कामात घाई गडबड करू नका.
कर्क
थोरांचे विचार जाणून घ्या. भावंडांचे सहकार्य मिळेल. जवळचे मित्र भेटतील. मानसिक ओढाताण जाणवू शकते. ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळवा.
सिंह
सडेतोडपणे वागून चालणार नाही. मनाची द्विधावस्था होणार नाही याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण सुखकर राहील. योग साधनेकडे मन वळवावे. वैचारिक स्पष्टता ठेवा.
कन्या
ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. वेळच्या वेळी निर्णय घ्यावेत. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.
तूळ
वैचारिक एकसूत्रता ठेवावी. मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडावे. उगाच चिंता करत बसू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. चांगली संगत लाभेल.
वृश्चिक
कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. उगाचच चिडचिड करून चालणार नाही. मानसिक शांतता लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
धनू
जुनी गुंतवणूक कामी येईल. मन प्रसन्न राहील. नवीन योजनांवर विचार करावा. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी कराल. एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल.
मकर
चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवस आळसात घालवून चालणार नाही. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कुंभ
योग्य तर्क वापरावा लागेल. भांडणापासून दूर राहावे. तडकाफडकी कोणतीही कृती करू नका. मनातील नकारात्मक विचार काढून टाकावेत. नामस्मरण करणे हिताचे ठरेल.
मीन
वाहन वेगावर मर्यादा घालावी. संयम सोडून वागू नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. अनावश्यक खर्च टाळावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर