महालक्ष्मी हिवरे येथे कृषीदुत विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण !

माका /प्रतिनिधी_
नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे या ठिकाणी,सोनई महाविद्यालयीन कृषीदुत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण सोहळा साजरा केला
,याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य कारभारी नारायण पालवे, मार्गदर्शक डाॅ.हरी मोरे,कृषी सहायक आर.पी.पवार,प्रा. एस.एन.दरंदले,प्रा.एस.एस.पटारे,यांनी यावेळी शेतकरी वर्गास मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास सरपंच सिमोन जाधव,संजय गायके ,शेतकरी वर्ग अंबादास सानप,राहुल भालेराव,किरण केदार,शुभम केदार,राजु पालवे,नवनाथ गायके,अरुण बोरुडे, भाऊसाहेब रणबावरे,पप्पु गायके,अशोक केदार,इतर ग्रामस्थ व शेतकरीवर्ग उपस्थित होते. या नियोजीत कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषद प्राथमीक शाळेत घेतल्याने शालेय कुलकर्णी सर,घुले सर,तसेच इतर शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यकर्माचे सूत्रसंचालन कृषिकेश डोंगर,नियोजन सौरभ जाधव,विशाल गांगुरडे,सुरज गोंदवले,अशोक खराडे,यांनी केले.