
नगर-अवतार मेहेरबाबांनी १० जुलेै १९२५ पासून पुढील ४४ वर्षे मौन ठेवले म्हणूंन मेहेरबाबा प्रेमींनी आज जगभरात मौन दिन पाळला.नगर जवळील दौंड रोडवरील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधीस्थळी व परिसरात हजारो मेहेरप्रेमींची उपस्थित होते व त्यांनी २४ तास मौन पाळले दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती तर परिसरात भाविक बसून होते.
आज सकाळी समाधी ६ वा दर्शनासाठी खुली करण्यात आली. दररोजची सकाळ व संध्याकाळची आरती आज करण्यात आली नाही तर मेहेरबाबांची झोपडी आज दर्शनासाठी उघडण्यात आली होती मौन दिनानिमित्त भारतातून मेहेरप्रेमी आले होते. यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होते व समाधी परिसरात हजारो भाविकांचे मौन पाळले तर रात्री ८ वा समाधी बंद करण्यात आली मेहेरबाबांनी ३ वेळा मौन पाळले होते परंतु १० जुलै १९२५ रोजीची सुरु केलेले मौन त्यांनी आयुष्यभर पाळले व एक शब्द कधीही उच्चारला नाही ते ३१ जानेवारी १९६९ पर्यंत ४४ वर्षांपर्यंत बोलले नाही.