इतर
सावता महाराज पुण्यतिथि निमित् माळीझाप येथे अखंड हरिनाम सप्ताह .

अकोले /प्रतिनिधी
माळीझाप (अकोले ) येथे संत सावता महाराज समाज मंदिर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथि निमित् 63 वा अखंड हरिनाम सप्ताह ह. भ. प. गोरक्ष महाराज वेलजाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे
बुधवार दिनांक २०/७/२०२२ रोजी योगी केशव बाबा चौधरी, ह. भ.प दिपक महाराज, अॅड. के.डी धुमाळ, ह.भ.प. विठ्ठलपंत गोडेे महाराज, ह. भ. प. एकनाथ पांडे महाराज, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, यांचे शुभहस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे
तसेच दैनंदिन कार्यक्रम, पहाटे ४ ते ६, काकडा,भजन, सकाळी ७ ते १० - ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ वा. गाथाभजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्रौ 8:30 ते 10:30 श्री. हरिकिर्तन रात्री 11 ते पहाटे भजन व जागर व ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह.भ.प. राजेंद्र महाराज देशमुख, तसेच किर्तनकार - बुधवार दि. २०/७/२०२२ ह. भ. प. - योगेश महाराज धात्रक (त्र्यंबकेश्वर), गुरुवार दि.२०/७/ २०२२. ह.भ.प राजेंद्र महाराज सदगीर (मुथाळणे) शुक्रवार दि. २२/७/२०२२. ह. भ.प. रेखाताई महाराज काकड (निह्राळे) शनिवार दि.२३/७/२०२२ ह.भ. प. मदन महाराज वर्पे (चिकनी) रविवार दि. २४/७/२०२२ह.भ. प. मनोहर महाराज सिनारे (राहुरी) सोमवार दि. २५/७/२०२२ ह.भ.प. अशोक महाराज जाधव (निगडी) मंगळवार दि. २६/७/२०२२ ह. भ.प. गोविंद महाराज करंजकर (आंबेजोगाई) बुधवार दि २७/७/ २०२२ रोजी सकाळी ११ ते ३ वाजता श्री संत सावता महाराजांचे प्रतिमेची सवाद्य मिरवणूक व सायंकाळी ४ ते ७ वाजता ह.भ.प उद्धव महाराज बिराजदार यांचे काल्याचे किर्तन होईल.व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन माळीझाप ग्रामस्थांनी केले आहे.