शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांची आबिटखिंड शाळेला भेट

अकोले : तालुक्यातील जांभळेवाडी केंद्रातील आबिटखिंड शाळेला अहिल्यानगरचे शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी आज भेट दिली. आदिवासी दु्र्गम भागातील शाळेची गुणवत्ता पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. मुलांच्या अक्षराचे त्यांनी विशेष कौतुक केले.
आज भास्कर पाटील यांनी आबिटखिंड शाळेला अचानक भेट दिली. शाळा भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता, परिसर स्वच्छता, मुलांची उपस्थिती आदी बाबींचा आढावा घेतला. मुलांशी त्यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वह्या पाहून अक्षराचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन करायला सांगितले असता त्यांनी अचून पणे पाठ्यपुस्तकाचे वाचन केल्याने त्यांनी गुणवत्ते बाबत समाधान व्यक्त केले.
मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे, शिक्षक सोमनाथ मुठे यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शिक्षक करत असलेल्या कामाचे श्री. पाटील यांनी कौतुक केले. त्यांच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी गौवर्धन ठुबे, केंद्रप्रमुख सुनील नरसाळे, भास्कर नरसाळे, केंद्रप्रमुख जनार्दन भवरे, विक्रम होळकर आदी उपस्थित होते. राजेंद्र उकिरडे यांनी सर्वांचे आभार मानले.