देशविदेश

देशाच्या नव्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू यांची निवड

जगातील सर्वात मोठया लोकशाही भारत देशाच्या राष्ट्रपती म्हणून भाजपप्रणीत एनडीएच्या वतीने द्रौपदी मुर्मू यांनची निवड झाली अन पहिल्या आदिवासी शिवाय महिला म्हणून त्यांची निवड गौरवास्पद आहे.

भारतीय स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर बसत आहे.          द्रौपदी मुर्मू या ओरिसामधील आदिवासी नेत्या आहेत. झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले आहे. द्रौपदी मुर्मू या ओरिसातील पहिला महिला आहेत की त्यांची राज्यपाल पदावर नियुक्ती झाली. झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांच्याकडे गेला.  त्याच वेळी कोणत्याही भारतीय राज्याच्या राज्यपाल बनलेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत.                   द्रौपदी मूर्म या २२ जूनला ओरिसातील मयुरभंज जिल्ह्यातील माहूलडिहा गावी त्यांच्या घरी होत्या. त्यांची मुलगी इतिश्री पण होती. इतिश्री सांगते की, ” सायंकाळी घरी फोन आला, तो बहुधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असावा. आईने तो फोन घेतला. फोनवरील बोलणे ऐकताना आई एकदम शांत होती. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. काही काळ ती बोलू शकली नाही. ती धन्यवाद एवढेच त्यांना म्हणाली.”          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निरोप मिळाल्यावर द्रौपदी म्हणाल्या, ” माझ्यासाठी, आदिवासी आणि महिलांसाठी हा क्षण ऐतिहासिक होता. झोपडीपासून ते देशाच्या सर्वोच्च पदाचे दावेदार म्हणूनच हा प्रवास लक्षणीय व अद्भुत आहे. त्या संथाल या आदिवासी समाजातून आल्या आहेत. त्यांचा परिवार खूप गरीब होता. घर चालविण्यासाठी एक छोटी नोकरी करावी एवढीच त्यांची इच्छा होती. त्यांना नोकरी मिळालीही.पण सासरच्या लोकांनी सांगितल्यावरून त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी मुलांना विनामूल्य शिकवायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या समाजसेवेला सुरुवात झाली. ”           मूर्म यांची उमेदवारी जाहीर होताच त्या प्रथम जगन्नाथ मंदिरात व शिवमंदिरात गेल्या. तेथे स्वत: झाडू मारून मंदिर स्वच्छ केले व पूजा-अर्चना केली. मंदिरात स्वत: झाडू मारणारी आदिवासी महिला राष्ट्रपती भवनात पोहचल्या आहेत.        द्रौपदी मुर्मूचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात एका ‘संथाल’ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू होते. त्याचे आजोबा आणि वडील दोघेही त्याच्या गावचे प्रमुख होते. त्यांनी श्याम चरण मुर्मूशी लग्न केले.  त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी होती.  दुर्दैवाने दोन्ही मुलगे आणि त्यांचे पती हे तिघेही वेगवेगळ्या वेळी अकाली मरण पावले. त्यांची मुलगी विवाहित असून ती ‘भुवनेश्वर’ येथे राहते. 

      द्रौपदी मुर्मू यांनी सुरुवात शिक्षिका म्हणून केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू राजकारणात प्रवेश केला. द्रौपदी मुर्मू यांनी १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्या भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्याही होत्या. द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून दोनदा विजयी झाल्या आणि त्या आमदार झाल्या.  ओरिसात नवीन पटनायक सरकार मध्ये बिजू जनता दल आणि भाजप युती सरकार मध्ये द्रौपदी मुर्मू यांना २००० ते २००४ दरम्यान वाणिज्य, वाहतूक आणि नंतर मत्स्य आणि प्राणी संसाधन खात्यात मंत्री करण्यात आले. द्रौपदी मुर्मू यांना मे २०१५ मध्ये झारखंडचे ९ वे राज्यपाल बनवण्यात आले. दरम्यान त्यांच्या एका मुलाचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला व त्यातून त्यांना नैराश्य आहे. २०१३ मध्ये दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. पाठोपाठ कुटुंबात दु:खाचे डोंगर कोसळत असताना त्याही खचून गेल्या होत्या. पण काही काळाने त्यांनी पुन्हा समाजसेवेत स्वत:ला गुंतवून घेतले. ओरिसामधील सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून त्यांना नीलकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      

       द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची चर्चा गेले तीन आठवडे देशात सर्वत्र चालू आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिलेची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड करताना भाजपने जो चाणाक्षपणा दाखवला त्याची कोणी कल्पना करू शकले नाही. एक महिला आणि तीही आदिवासी तसेच प्रभावशाली अशी मोठी गुणवत्ता द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीमागे आहे. त्यामुळे विरोधी पक्षालाही भाजपने संभ्रमात टाकले. द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला उघड विरोध करण्याचे धाडस कोणत्याही विरोधी पक्षात नाही, तेवढी हिंमतही कोणत्याही राजकीय पक्षात झाली नाही. त्यात द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएचे उमेदवार म्हणून बाजी मारली. भाजपप्रणीत एनडीएची उमेदवारी मिळणे हेच मोठे यश आहे. भाजपचा उमेदवार म्हणून विजयाची पक्की खात्री होती. कारण तेवढे संख्याबळ भाजपकडे आहे. द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित होता. देशाच्या राष्ट्रपती होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबात होते.        एका आदिवासी महिलेला केंद्रातील सत्तेवर असलेला भाजप देशातील सर्वोच्च पदावर बसवत आहे ही भावना जनतेत दिसून येते. अर्थात त्याचा लाभ येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निश्चितच या पक्षाला मिळू शकतो. लोकसभेतील ५४४ जागांपैकी ४७ जागा या अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव आहेत. साठहून अधिक लोकसभा मतदारसंघात आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र छत्तीसगढ, राज्यांत आदिवासी मतदार निर्णायक ठरू शकतात. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यात येत्या एक ते दीड वर्षांच्या कालावधीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम्ही ज्या अकोले विधानसभा मतदारसंघात राहतो तो आदिवासी समाजासाठी कायम राखीव असून हिंदू महादेव कोळी व ठाकर या अनुसूचित जमाती चे लोक येथे राहतात. यासमाजात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. हिंदू महादेव कोळी व ठाकर समाजचे स्वतंत्र संग्रामात बहुमोल योगदान आहे. तसेच मूर्म या पण संथाल या आदिवासी लढाऊ जमातीच्या आहेत. भुवनेश्वरच्या उपजिल्हाधिकारी विजया वार्ष्णेय यांनी सांगितले की, तेव्हा एका दुपारी मी सरकारी दौरा करून कार्यालयात आले. तेव्हा एका महिलेला कार्यालया बाहेर बाकावर बसलेली बघितले. मी तिला आत बोलावुन येण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने सांगितले बरेच दिवस झाले, माझी एक अर्जी देऊन त्यात माझी जमीन विकायची आहे त्या संबंधित मंजुरी हवी आहे.      ति फाईल तपासताना लक्षात आले, या पुर्वी पण तीन वेळा ती महिला विक्री ची मंजुरी घेऊन गेली होती, पण अजून तिने जमीन विकलेली नाही. तिला कारण विचारलं तर तिने जे सांगितले, मी नि:शब्दच झाले. पहिल्यांदा तिला मंजुरी मिळाली तर तिचा एक मुलगा अचानक वारला म्हणून विकायचे राहुन गेले. परत दुस-यांदा विकायला काढली तर नव-याचा मृत्यू झाला. या सगळ्यातून सावरले आणि परत मंजुरी मिळवली तर एकमात्र आधार असलेला दुसरा मुलगा पण वारला. आता मला कर्ज फेडण्यासाठी जमीन विकायची आहे. त्यासाठीच मंजुरी हवी आहे .मी लगेच मंजुरी दिली. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार “श्रीमती दौपदी मुर्मु” आहेत. ज्या स्वत: एक मंत्री असून बिना डामडौल, लवाजम्याशिवाय, एका साधारण नागरिका सारख्या कार्यालयात आल्या आणि मंजुरी मिळवली. आम्हाला अभिमान आहे अशी व्यक्ती आपल्या देशाची राष्ट्रपती झाली आहे .

———–

भाऊसाहेब वाकचौरे पाटील

(जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मिडिया सेल, उत्तर नगर जिल्हा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button