पवार कुटुंबीयांनी केला हौशी गायीचा दशक्रिया विधी!

कोतुळ प्रतिनिधी
25 पेक्षा अधिक गाईंचे उत्पादन देणाऱ्या हौशी गाईने कुटुंबाला आर्थिक बरकत दिल्याने तिच्या ऋणातून उतराई होण्याचे उद्देशाने पवार कुटुंबियांनी हौशी गाईचा दशक्रिया विधी विधीवत पूर्ण केला
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील बाळासाहेब पवार कुटुंबीयांना हौशी गाईने 25 पेक्षा अधिक गाईंचे उत्पादन दिले यामुळे या कुटुंबाची भरभराट झाली त्या गाईला त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले म्हातारपणात देखील तिचा चांगला सांभाळ करत आपल्याच गोठ्यात तिला अखेरचा निरोप दिला आणि तिचा अंत्यविधी तसेच दशक्रिया विधी देखील तेवढ्याच माणुसकीने केला बाळासाहेब ̊प्रभाकर पवार ,हिराबाईे बाळासाहेब पवार ,गणेश बाळासाहेब पवार पुनम गणेश पवार ,कार्तिक गणेश पवार,ज्ञानेश्वरी गणेश पवार…या कुटुंबातील सदस्यांनी हौशी गाईचा सांभाळ केला
या आगळ्यावेगळ्या दशक्रिया विधीचे परिसरात कौतुक होत आहे यापूर्वी देखील त्यांनीआपल्या गोठ्यातील एका गाईचा दशक्रिया विधी केला होता आपल्याच गोठ्यात गेलेली ही दुसरी गाई हौशी गेल्याने त्यांनी हौशी चा दशक्रिया विधी विधिवत पूर्ण केला
यावेळीजिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख अगस्तीचे संचालक बाळासाहेब देशमुख कोथरूड ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र पाटील देशमुख शंकर घोलप मोग्रास गावचे प्रगतशील शेतकरी शांताराम गोडसे, , आदी सह परिसरातील मान्यवर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते

——–