ग्राहक संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा सचिवपदी शिवाजी भागवत

ग्राहक वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
-शिवाजी भागवत
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील विरोली येथील शिवाजी भागवत यांची नुकतीच ग्राहक संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. शिवाजी भागवत हे पुणे या ठिकाणी व्यवसाय निमित्त कार्यरत असून त्या ठिकाणी सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते उत्तम असे काम करत आहेत. ग्राहक संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा सचिव पदी त्यांना ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी, महाराष्ट्र अध्यक्षा सौ रंजनाताई देशमुख यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
ग्राहकांच्या प्रश्नांवर शिवाजी भागवत हे बऱ्याच दिवसापासून काम करत आहेत. ग्राहकांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रभागी असतात ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा सचिव पदी त्यांची निवड करून खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला न्याय मिळाला आहे.
निवडीनंतर बोलताना शिवाजी भागवत म्हणाले की समाजामध्ये आज ग्राहकांची विविध माध्यमातून फसवणूक होत आहे. ग्राहक वर्गाच्या अनेक प्रश्न व समस्या आज आ पासून उभे आहेत. त्या सोडवण्यासाठी व त्याची खऱ्या अर्थाने सोडवणूक होण्यासाठी ग्राहक संरक्षण समितीच्या माध्यमातून मी व माझे सहकारी कार्यरत राहणार आहोत. ग्राहक वर्गाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल.
दरम्यान शिवाजी भागवत हे पारनेर तालुक्यातील विरोली येथील असून विरोली या ठिकाणीही त्यांचे नेहमीच सामाजिक अध्यात्मिक कार्यामध्ये सहभाग असतो. शैक्षणिक सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनही ते काम करत असतात. पारनेर तालुक्यातील एका युवकाला खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा या ठिकाणी ग्राहक संरक्षण समितीच्या जिल्हा सचिव पदावर काम करण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून त्यांनी सर्व स्तरातील लोकांचे प्रश्न सोडवावेत.
निवडीनंतर पारनेर तालुक्यातील त्यांच्या मित्र परिवाराने व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष तसेच ग्राहक संरक्षण समितीचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष सोबले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार गणेश जगदाळे यांनी त्यांचे निवडीनंतर अभिनंदन केले आहे.