आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०४/०४/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १५ शके १९४५
दिनांक :- ०४/०४/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १६:१५,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति २०:१२,
योग :- सिद्ध समाप्ति १३:१५,
करण :- बव समाप्ति २६:५५,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०४नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०५ ते ०३:३७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:२२ ते ०७:५४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३२ ते ०२:०५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०५ ते ०३:३७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१० ते ०६:४२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड १६:१५ प., भद्रा १६:१५ प., दशमी – एकादशी श्राद्ध,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
💐🌺🌼🌹🌾🍀
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १५ शके १९४५
दिनांक = ०४/०४/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
कामातील उत्साह व जोम वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. नवीन संधि उपलब्ध होतील. कागदपत्रांची नीट छान नि करावी. आवडी निवडीबाबत दक्ष राहाल.
वृषभ
प्रत्येक गोष्टीचा आनंद उठवाल. कामात अधिक आवडीने रस घ्याल. तोंडात साखर ठेवून वागाल. हौसे खातर खर्च कराल. करमणुकीचे कार्यक्रम आखाल.
मिथुन
अधिकारी वर्गाचा सल्ला घ्यावा. मोठ्या लोकांची गाठ घ्याल. कमिशन मधून फायदा होईल. बरेच दिवसांची सुप्त इच्छा पूर्ण होईल. संपर्काचा फायदा करून घ्याल.
कर्क
जोडीदाराची कमाई वाढेल. लेखक वर्गाला चांगला फायदा होईल. बुद्धिकौशल्याने मन जिंकून घ्याल. तुमचे कसब कामाला लावाल. कामात स्त्री वर्गाची मदत होईल.
सिंह
कलाकारांचे कौशल्य दिसून येईल. वरिष्ठांना खुश करू शकाल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. वेळेचा योग्य सदुपयोग कराल.
कन्या
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. चर्चेतून योग्य मार्ग निघेल. कौटुंबिक प्रश्न समजूतदारपणे हाताळाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. भागीदारीत नवीन योजना आखाल.
तूळ
तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील. कमी श्रमात कामे पूर्ण करता येईल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधावा. देणी भागवता येतील.
वृश्चिक
एककल्ली विचार करू नका. अती आग्रह बरा नव्हे. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवावे. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल.
धनू
दिवस मना प्रमाणे घालवाल. बोलताना सारासार विचार करावा. घरगुती कामे अंगावर पडतील. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका.
मकर
उष्णतेचे विकार संभवतात. पचनास हलके पदार्थ खावेत. डोके थंड ठेवावे लागेल. फार काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. उगाचच चिडचिड करू नये.
कुंभ
आरोग्यात सुधारणा होईल. कामाचा आनंद घेता येईल. हातातील अधिकाराचा वापर करता येईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल. चैनीची आवड जोपासाल.
मीन
गप्पांमध्ये रमून जाल. हसत-हसत कामे पूर्ण कराल. निसर्ग सानिध्याची ओढ वाढेल. सामाजिक गोष्टीत हातभार लावाल. मित्रांची नाराजी गोडीने दूर करावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर