आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२६/०७/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०४ शके १९४४
दिनांक :- २६/०७/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०५,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति १८:४८,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति २८:०९,
योग :- व्याघात समाप्ति १६:०७,
करण :- विष्टि समाप्ति –:–,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:५० ते ०५:२८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:५० ते ०५:२८ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
शिवरात्रि, संत नामदेव पु. ति., भद्रा १८:४८ नं., यमघंट २८:०९ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०४ शके १९४४
दिनांक = २६/०७/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल. व्यापारातील फायदा भरून काढावा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आनंदाचा गुणाकार होईल.
वृषभ
नवीन कामात हात घालावा. जमिनीच्या कामात यश येईल. मैत्रीचे संबंध जपावेत. मानसिक समाधान लाभेल. दिवस हास्य-विनोदात जाईल.
मिथुन
कौटुंबिक समस्या सोडवाल. मुलांसाठी खरेदी कराल. जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा.
कर्क
नवीन ओळखीतून कामे होतील. काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मत अधिक स्पष्टपणे मांडाल.
सिंह
मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. कामात काही बदल करावे लागतील. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील.
कन्या
कौटुंबिक ताण हलका करावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. आदर, आपुलकी कायम ठेवावी.
तूळ
घरातील कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत.
वृश्चिक
जिभेवर ताबा ठेवावा, अन्यथा मन खिन्न होऊ शकते. करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
धनू
मुलांची बाजू समजून घ्यावी. खेळकर वृत्तीने वागावे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे. मानसिक संतुलन राखावे.
मकर
आर्थिक बाबीत जागरूक राहावे. महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा. नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात. प्रवास सावधानतेने करावेत. धार्मिकतेकडे ओढ वाढेल.
कुंभ
अधिकार्यांच्या सल्ल्यानेच वागावे. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा.
मीन
सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करत राहावे. दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर