मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजालाआरक्षण देवून न्याय द्यावा- डॉ,कृषीराज टकले

शेवगाव -मराठा समाजाचा शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणे अतिशय महत्वाचे आहे महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने दुर्लक्ष करुन समाजाला उपेक्षित ठेवले आहे त्यामुळे शिंदे व भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा यासाठी तुळजाभवानीला
साकडे घालून मराठा आरक्षणाची मागणी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ,कृषीराज टकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे
मराठा आरक्षण समीतीचे अध्यक्ष माजी मंत्री अशोक चव्हाण होते त्यावेळी या समितीच्या अध्यक्षस्थानी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी मराठा समाजाची होती आता तर मुख्यमंत्रीच एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे शिंदे यांनी मराठयांना आरक्षण देवून न्याय द्यावा अशी मागणी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषीराज टकले यांनी केली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लवकरच स्वाभिमानी मराठा महासंघ मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचे स्मरण पत्र पाठवणार असलयाचे संघटनेचे संस्थापक डॉ कृषीराज टकले यांनी सांगितले