व्यंगचित्र प्रदर्शनात अरविंद गाडेकर यांच्या व्यंगचित्राची निवड.

पुण्यात व्यंगचित्र महोत्सव राज्यातील नामवंत व्यंग चित्रकारांचा सहभाग
संगमनेर- राज ठाकरे, ज्ञानेश सोनार, विजय 0उ0पराडकर, संजय मिस्त्री, प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर, चारुहास पंडित,खलील खान या दिग्गज व्यंगचित्रकारांसह महाराष्ट्रातील ७१ व्यंगचित्रकारांची व्यंगचित्र शब्दविरहित व्यंगचित्र प्रदर्शनात झळकणार आहेत. संगमनेरचे व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्राची निवड या सलाम हसऱ्या रेषांना शब्दविरहित व्यंगचित्र प्रदर्शनासाठी झाली आहे.
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द. फडणीस २९ जुलैला ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत तसेच त्यांच्या शब्दविरहित कारकिर्दीला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त तीन दिवसीय व्यंगचित्र महोत्सव बालगंधर्व कलादालन पुणे येथे कार्टूनिस्ट कंबाइन या संघटनेने आयोजित केला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते , लेखक दिलीप प्रभावळकर यांचे हस्ते होणार आहे. प्रदर्शन, प्रात्यक्षिक, मुलाखत आणि चर्चा, भाषा रेषांची हा गप्पांचा कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम २९,३०,३१ जुलै असा तीन दिवस प्रेक्षकांसाठी खुला प्रवेश आहे.

