अकोल्यात ‘संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा’ सम्पन्न

अकोले प्रतिनिधी-
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. सकाळी नवं दाम्पत्य विरेन नंदकुमार गुजर व सौ.क्षितिजा विरेन गुजर यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा सम्पन्न झाली.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची शोभा यात्रा अकोले शहरातील मुख्य रस्त्यांवरुन काढली.या शोभायात्रेसाठी पुरुषांनी सफेद पारंपारिक ड्रेस व महिलांनी एकाच कलरची काठपदराची साडी व फेटे परिधान करून वैष्णवांचा व हिंदुधर्मीयांचा मानबिंदू असलेले भगवे झेंडे सहअतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पध्दतीने समाजाला आदर्श अशी मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेत चोमदेव ऋषी वारकरी संस्थेच्या 35 बाल वारकऱ्यांनी सहभागी होऊन रिंगण सोहळा सादर करून अकोलेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.महिलांनी फुगडी व नृत्याचा ताल धरला होता.यावेळी माहेश्वरी मंगल कार्यालयात हभप अनिल महाराज तळपे यांचे सुश्राव्य किर्तनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.यानंतर गुणवंत विद्यार्थी सोहम अजय गुजर व ऋषिकेश मंगेश खांबेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा सौ.सोनालिताई नाईकवाडी, जेष्ठ नेते ऍड वसंतराव मनकर, महिला व बालकल्याण च्या सभापती सौ. प्रतीभाताई मनकर,बांधकाम समिती च्या सभापती सौ.वैष्णवी धुमाळ, अमित नाईकवाडी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा सौ.नाईकवाडी यांनी मंदिरासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे अश्वसित केले तर ऍड.मनकर यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
या वर्षीचा महाप्रसाद मंगेश जगन्नाथ खांबेकर, संतोष कृष्णराव खांबेकर, संदिप गजानन खांबेकर ,सुनिल गजानन गुजर व रमेश गजानन गुजर या सर्व मान्यवरांनी दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष संजय गुजर,सेक्रेटरी मनोज खांबेकर,उपाध्यक्ष संतोष खांबेकर, चंद्रकांत खर्डे,प्रमोद भुसे,अनिल गुजर,अनंत कल्याणकर,विकास अवसरकर,ज्ञानेश्वर अवसरकर ,सुनील गुजर,अनिल गुजर,रमेश गुजर,संदीप खांबेकर, मंगेश खांबेकर,संदीप गुजर,चंद्रकांत भुसे आदींसह संत नामदेव शिंपी समाजातील समस्त महिला व पुरूषांनी परिश्रम घेतले. या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने सर्वानी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला विशेषतः महिला वर्गाने खूपच मनापासून आणि अतिशय उत्साहाने सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.