जल जीवन मिशन अंतर्गत कान्हुर पठार सह १६ गावांसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी

विरोधकांचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न
राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक घुले
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
जल जीवन मिशन अंतर्गत कान्हुर पठार सह १६ गावांसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.जलजीवन मिशन अंतर्गत महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी तत्कालीन राज्याचे अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार तत्कालीन ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.कान्हुर पठार सह १६ गावातील
या पाणी योजनेच्या विविध विकास कामांसाठी जवळपास ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी टाकला होता. त्यानुसार या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंकेच्या यांच्या प्रयत्नातून कान्हूर पठार व १६ गाव पाणी पुरवठा योजनेस ३८ कोटी ४८ लक्ष निधीच्या कामास मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे या कान्हुर पठारसह १६ गावच्या पाणी योजनेस पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली असून थकित विज बिलासह इतर दुरुस्तीसाठी सुद्धा निधी शासनाने दिला आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कान्हुर पठार सह १६ गावच्या पाणी योजनेसाठी जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनेचे जॅक वेलसह पंपहाऊस योजनेतील अनेक गावात वाढीव साठवण पाण्याच्या टाक्या योजनेतील पाईपलाईन दुरुस्ती विज बिल यांच्यासह जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्तीसाठी वितरण व्यवस्था हा निधी देण्यात आलेला आहे. थकित वीज बिलामुळे गेल्या अनेक वर्षापासून कान्हुर पठार सह १६ गावची ही पाणी योजना बंद अवस्थेत आहे त्यामुळे आमदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून निधी मिळावा अशी वेळोवेळी मागणी केली होती. मांड ओहोळ धरणावरून असलेल्या कान्हुर पठारसह १६ गावातील ग्रामस्थांकडून ही योजना कार्यानित करण्यात यावी अशी मागणी आमदार निलेश लंके यांच्याकडे करण्यात आली होती त्यानुसार आमदार लंके यांच्या प्रयत्नाला यश आले असून या पाणी योजनेसाठी जवळपास ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला
– ज्यांना गावातील खड्डे बुजवता
आले नाही ते श्रेय घेण्यासाठी पुढे
राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोकराव घुले
कान्हुर पठार सह सोळा गावच्या पाणी योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अनेक मंत्र्यांचे व अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले असून या ३८ कोटी ४७ लाख रुपये निधीचे श्रेय फक्त आमदार निलेश लंकेचे आहे. त्यामुळे दोन दिवसात सरकार आले आणि लगेच निधी मिळाला अशी कधी होत नाही. त्यामुळे ज्यांना आपल्या गावातील रस्ते दुरुस्त करता आले नाही खड्डे बुजवता आले नाही त्यांनी विकास कामांचे श्री घेऊ नये असा टोला सुजित झावरे यांना लगावला असून विरोधकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक घुले यांनी टिका केली आहे.