इतर

गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप.

पुणे प्रतिनिधी दि 30.

राज्यभर उल्लेखनीय कार्य करणारी संस्था. राष्ट्रीय मानव अधिकार हक्क .मानव कल्याण कमिटी.उमंग बहुउदेशिय फिल्म असोशिएन .या संस्थेच्या माध्यमातून गरिब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन. या ठिकाणी संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लिंगाडे सर यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे .बिभिषन जाधव.(सदस्य झोनल रेल्वे कनट्रन्सलेट कमिटी भारत सरकार)मा.सुनिल साळवी. (राष्ट्रीय दिव्यांग कार्य अध्यक्ष )मा.महेश माने.(व्हा.चेअरमन अक्कलकोट कारखाना. मा.अकील राजपूत. सहा.पोलीस उपनिरीक्षक. हे उपस्थित होते.

गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात. प्रमुख पाहुणे मा.सुनिल साळवी म्हणाले शिक्षणासाठी मद्त व्हावी .विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लिंगाडे सर खुप मोलाचे कार्य करत आहे. आसे त्यांनी गौरव उदगारात म्हटले.मा.शैलेश तुरवणकर.आर.एम.एच.मंत्री यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मुळमंञ शिका संघटित व्हा व संघर्ष करा.याची
आठवण करून दिली. मा.राजेंद्र लिंगाडे.म्हणाले.विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यांना शिक्षणासाठी मद्त व्हावी म्हणून वह्या वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.

संस्थेने पाच जिल्ह्यात वह्या वाटप करण्यासाठी पाठवल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय मानव अधिकार हक्क राष्ट्रीय महिला अध्यक्ष मा माधवीताई चोपडे. यांनी आलेल्या सर्व पाहुण्याचै स्वागत केले. व मुले ही राष्ट्राची
संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना सहकार्य करुन त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. आम्ही सगळे झटत राहु असे
सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button