लोकशाहीरअण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

पुणे प्रतिनिधी
. राष्ट्रीय मानवाधिकार हक्क संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लिंगाडे यांनी यांच्या कार्यकर्त्यांसह साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे म्हणजे बुलंद तोफ एक खणखणीत शाहीर दिन दुबळ्यांचे उपेक्षितांचे कामगार श्रमिकांचे ज्वलंत प्रश्न सरकार पुढे मांडण्याचा त्यांचा आगळावेगळा अविष्कार . डफावर थाप मारून जनतेला जाग करण्याचे काम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे करत होते गोवा मुक्ती चळवळीमध्ये अण्णाभाऊ म्हणायचे यह आजादी झुटी है जनता भुकी है गिरणी कामगाराच्या प्रश्नासाठी अहो रात्र झटणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ म्हणायचे जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव हे त्यांचं वाक्य आपण लक्षात ठेवायला पाहिजे असे यावेळीराजेंद्र लिंगाडे यांनी सांगितले
या प्रसंगी प्रमुख पाहुणे महेश माने, अक्कलकोट सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पुणे शहर कार्याध्यक्ष रज्जाक भाई शेख.राजेश साळवे.अदि उपस्थित होते.