
अकोले प्रतिनिधी
अकोले शहरातील इंदिरानगर या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली
या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाहुनगर येथील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व खावुचे वाटप करण्यात आले .
साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांनी लिहलेल्या साहित्याविषयीची व कार्याविषयी माहिती या प्रसंगी विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना देण्यात आली
लोकशहिर आण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा नवतरुणांनी असाच पुढे चालवावा तसेच जीवन जगतांना तरुणांनी आण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसाद करावेत असे मत दलितमिञ प्रकाश साळवे यांनी व्यत्क केले.

आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन दलितमिञ प्रकाश साळवे व पञकार सचिन खरात यांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी गोकुळ अवचिते,तुषार अवचिते,निलेश लांडगे,अनिल जाधव, कांतिराम साळवे,अनिल बलसाने, राहुल गायकवाड,राजु ठावरे,बाला पठाण,सागर अवचिते,अमोल मोहिते, स्वप्निल आव्हाड,सोहन गायकवाड,बबलु गायकवाड ,सागर गायकवाड तसेच जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक बांगर व साबळे सर या प्रसंगी उपस्थित होते.