नेप्तीत ईद-ए-मिलाद निमित्त भंडाऱ्याचे वाटप.

पैगंबर यांनी जगाला शांतीचा संदेश दिला – रामदास फुले
अहमदनगर प्रतिनिधी
नगर तालुक्यातील नेप्ती येथे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात भव्य जुलूस मिरवणूक काढण्यात आली मुस्लीम समाजाचे वतीने भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले
गावात शांतता नांदावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर मुस्लिम बांधवांनी गणपती उत्सव नंतर गुरुवारी गावातून भव्य अशी जुलूस मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधवा बरोबर हिंदू बांधव ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत होते .गावात चौका चौकात या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले . यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचा नारा देण्यात आला .
सरपंच संजय जपकर यांनी जुलूस मिरवणुकीचे स्वागत करून अरबाज शेख व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या

.यावेळी माजी उपसरपंच फारुख सय्यद ,माजी उपसरपंच संजय जपकर, अरबाज शेख, समता परिषदेत तालुकाध्यक्ष रामदास फुले, उपसरपंच दादू चौगुले, जालिंदर शिंदे, प्रा. एकनाथ होले, मुनीर सय्यद, बाबुलाल सय्यद, वाजीद सय्यद, आफताब सय्यद, परवेज सय्यद ,नावेद सय्यद, इमरान सय्यद, जमीर सय्यद, रफिक सय्यद, राहुल गवारे, महेंद्र चौगुले ,उमर सय्यद, जावेद सय्यद, नौशाद शेख, सलीम सय्यद ,इजाज सय्यद ,समीर सय्यद, बादशाह सय्यद, नितीन कदम, बंडू जपकर, आसिफ सय्यद, संतोष चहाळ ,भूषण पवार ,हुसेन सय्यद, मुक्तार सय्यद, युनूस सय्यद, कयूम सय्यद, मोईन सय्यद ,पोलीस पाटील अरुण होले, रवींद्र होळकर ,विलास जपकर , बबन सय्यद, सिकंदर शेख, नाले हैदर यंग पार्टीचे कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचा लाभ घेतला . नाले हैदर यंग पार्टीच्या वतीने चौकात सजावट करण्यात आली होती तसेच चौका चौकात झेंडे लावण्यात आले होते.
सर्व धर्मात प्रेम शांतता व माणूसकीचा संदेश देण्यात आलेला आहे. विविधतेमध्ये असलेली एकता हे भारत देशाचे वैभव आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जाती धर्मातील स्वातंत्र्य वीरनी योगदान दिले आहे .संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ईश्वराने पैगंबर यांना भुतलावर पाठवले होते व त्यांनी जीवन कसे जगावे हे जगाला दाखवून दिले. मुस्लिम धर्माचे धर्मगुरू नबी रसूल हजरत महंमद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश दिला आहे. असे समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी सांगितले