राज्य मराठी पत्रकार संघाची संगमनेर तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी संजय गोपाळे, उपाध्यक्ष स्वानंद चत्तर, तर सचिवपदी अमोल मतकर यांची निवड

संगमनेर दि 1 प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजय भोकरे , राज्याध्यक्ष किरण जोशी, सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवड समितीचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, उपाध्यक्ष स्वानंद चत्तर, सचिव अमोल मतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामीणभागात पत्रकारिता करताना येणारी आव्हाने विचारात घेवून पत्रकारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी नूतन पदाधिकार्यांनी दिली.
रविवारी (ता.31) शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत नूतन अध्यक्षपदासाठी संजय गोपाळे यांच्या नावाची सूचना मावळते अध्यक्ष सोमनाथ काळे यांनी मांडली, त्याला गोरक्षनाथ मदने यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी स्वानंद चत्तर यांच्या नावाची सूचना विकास वाव्हळ यांनी मांडली, त्याला भारत पडवळ यांनी अनुमोदन दिले. तर, सचिवपदासाठी अमोल मतकर यांच्या नावाची सूचना बाळासाहेब गडाख यांनी मांडली त्याला संजय साबळे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी अध्यक्ष गोपाळे यांनी सांगितले की, तालुक्यातील संघटने मार्फत कमी वेळेत जास्त कामे करून संघटनेची ताकद वाढविण्यासाठी आम्ही पदाधिकारी कटिबद्ध असतील. तसेच संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारिता करतांना समोर येणारी आव्हाने, अडचणी यासोबतच पत्रकारांचे संरक्षण, आरोग्य या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकार आणि समाज यांचे परस्परांशी असलेले नाते विचारात घेवून पत्रकारांनी समाजासाठी काहीतरी उपक्रम राबविण्यावरही यावेळी सूचना करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने नेहमीच पत्रकारांच्या हितासाठी काम केले आहे. संघटनेच्या चौकटीत राहून पत्रकारांसाठी काम करण्याचा मनोदय यावेळी नूतन पदाधिकार्यांनी व्यक्त केला. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार विकास वाव्हळ, भारत पडवळ, आनंदा जोंधळे, भारत रेघाटे,संजय साबळे, बाळासाहेब गडाख, गोरक्षनाथ मदने, बाबासाहेब कडू , गोरक्ष नेहे, संजय अहिरे, सुखदेव गाडेकर, आदी सदस्य उपस्थित होते.