संगमनेर रोटरीच्या अध्यक्षपदी ऋषिकेश मोंढे तर सेक्रेटरीपदी आनंद हासे यांची निवड

रविवारी पद्ग्रहण समारंभ
संगमनेर/प्रतिनिधी–
रोटरी क्लब संगमनेरच्या अध्यक्षपदी उद्योजक ऋषिकेश मोंढे, सचिवपदी उद्योजक आनंद हासे तर खजिनदारपदी विश्वनाथ मालाणी यांची निवड करण्यात आली.
सन २०२२-२३ कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली रविवार दि. ७ ऑगष्ट रोजी बाफना हॉल, संगमनेर कॉलेज येथे सायंकाळी ५.३० वाजता पदग्रहण समारंभाचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षाकरिता औरंगाबाद येथील रुक्मेश जखोटीया हे रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे गव्हर्नर आहेत या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर ईलेक्ट २०२३-२४ रो. स्वाती हेरकळ तसेच संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
१९८४ साली स्थापन झालेल्या रोटरी क्लब संगमनेर या संस्थेने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. यावर्षी क्लब ३९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मागील वर्षी कोविडमध्ये पती गमाविलेल्या महिला भगिनींना १११ कमर्शिअल आटा चक्की तसेच ६१ शिलाई मशीन क्लबमार्फत वाटण्यात आले. गेल्या २ वर्षात सुमारे २००० मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करून ती जगविण्याचे काम क्लबने केले आहे. रोटरी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून १९८९ पासून क्लबने २५ हजारांपेक्षा जास्त मोफत मोतिबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया करुन त्याद्वारे आरोग्य क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे. नूतन अध्यक्ष ऋषिकेश मोंढे यांचा संगमनेर औद्योगीक वसाहतीत इंडस्ट्रीयल फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सेक्रेटरी आनंद हासे यांचा संगमनेर औद्योगिक वसाहतीत फ्लेक्झीबल पॅकेजिंग मटेरिअल मॅन्युफॅक्चरींगचे युनिट आहे, तसेच दैनिक युवावार्ता या वर्तमानपत्राचे ते संचालक आहेत. दोघेही सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेत असतात.
क्लबच्या सन २०२२-२३ साठी नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये महेश वाकचौरे – उपाध्यक्ष, डॉ. किशोर पोखरकर – सहसेक्रेटरी, योगेश गाडे – माजी अध्यक्ष(२१-२२), अमित पवार – सार्जंट एट आर्मस्, दिलीप मालपाणी – रोटरी फाऊंडेशन, संजय राठी – स्पेशल प्रोजेक्ट, रवि पवार – क्लब ट्रेनर, दिपक मणियार – व्होकेशनल सर्व्हिस, अजित काकडे – क्लब एडमिनिस्ट्रेटर, नरेंद्र चांडक – लिटरसी, सुनिल कडलग – आरआय एम्फासीस, मधुसुदन करवा – क्लब मेंबरशीप, संजय कर्पे – पब्लिक इमेज, ओंकार सोमाणी – नॉन मेडीकल सर्व्हिस, डॉ. विकास करंजेकर – मेडीकल सर्व्हिस, सुनिल घुले – पर्यावरण, डॉ. प्रमोद राजुस्कर – ह्युमन डेव्हलपमेंट, प्रमोद मणियार – डायव्हर्सिटी, मोहित मंडलिक – सोशल मिडीया, मयुर मेहता – डिस्ट्रीक्ट एम्फासीस, संकेत काजळे – युथ सर्व्हिसेस आदि सदस्यांची निवड करण्यात आली.
नुतन अध्यक्ष, सचिव व संपुर्ण कार्यकारिणीचे समाजातील सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.