इतर
खरवंडी कासार येथे श्रीसंत जनार्धन स्वामी महाराज समाधी मंदीरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन

पाथर्डी – पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे श्रीसंत जनार्धन स्वामी महाराज यांच्या समाधी मंदीरात अखंड हरिणाम सप्ताहास श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला
भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण महाराज स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीसंत जनार्धन स्वामी यांच्या समाधी स्थळावर पुष्पवृष्टी अर्पण करूण सप्ताहास प्रारंभ झाला
या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येनेउपस्थित होते सप्ताह निमित्त ,समाधी स्थळाची आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आव्हान गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे