पत्नीचा खून करणाऱ्या नराधमास अखेर जन्मठेप

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील आश्वि येथे पत्नीचा खून करणाऱ्या नराधमास अखेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली
आश्वी पोलीस स्टेशन अंतर्गत गु रं 2016 भादवि कलम 302 498 ए 323 34 प्रमाणे दाखल गुन्ह्यात फिर्यादी भाऊसाहेब संभाजी कदम राहणार पाथरे बुद्रुक तालुका राहाता यांनी दिनांक 30 /7/ 2016 रोजी मुलगी वर्षा बाळासाहेब पिलगर (वय 27 )राहणार आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर हिस तिचा पती बाळासाहेब भिकाजी पिलगर (वय 30 )सुरेश भिकाजी पिलगर (वय 26) सासु लिलाबाई भिकाजी पिलगर(वय 50 )राहणार आश्वी तालुका संगमनेर यांनी संगनमत करून मयत वर्षा बाळासाहेब पिलगर दुसऱ्यांदा गरोदर राहिली होती याची माहिती आरोपींना समजल्याने त्यांनी गर्भपात करण्यास सांगितले असता तिने ते ऐकले नाही याचा राग मनात धरून यातील मयत वर्षा बाळासाहेब पिलघर हिचे नाका-तोंडावर उशीने दाबून व उजव्या हाताचेतर्जनी चे बोटाला वायर बांधून विजेचा शॉक देऊन ठार मारले वगैरे याची फिर्याद दिलीहोती
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सपोनि योगेश कांबळे लेखनिक हवलदार तात्याराव यादवराव वाघमारे यांनी केला सदर आरोपी विरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे रासायनिक पुरावे व इतर 12 साक्षीदार तयार करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले सदरचा खटला माननीय जिल्हा न्यायाधीश श्री मनाकर वाय पी यांचे संगमनेर कोर्टासमोर सुनावणी झाली त्यात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले त्यात महत्त्वाची भूमिका सरकारी वकील श्री मच्छिंद्र गवते साहेब यांनी परिस्थितीजन्य पुराव्याच्या व रासायनिक पुराव्यांचा व साक्षीदारांचा पुरावा कोर्टात सादर करून प्रबळ युक्तिवाद केला त्यात न्यायवैद्यक शास्त्रज्ञ प्रवरा हॉस्पिटल येथील डॉक्टर संजय गुप्ता ,साक्षीदार प्रकाश मदने व तपासी अधिकारी सपोनि योगेश कामाल यांची साक्ष महत्त्वाची ठरली त्या अनुषंगाने माननीय वायपीकर जिल्हा न्यायाधीश संगमनेर कोर्ट यांनी आरोपी बाळासाहेब भिकाजी यास भादवि कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली व इतर आरोपी विरुद्ध पुरावा न आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले सदर खटल्यात सरकारी वकील श्री मच्छिंद्र गवते यांना ,सारिका डोंगरे सुनील सरोदे पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत जोर्वेकर, पोलीस कॉन्स्टेबल दवंगे, पोलीस कॉन्स्टेबल साठी यांचे विशेष सहकार्य लाभले