समनापुर सेवा सोसायटीचे अध्यक्षपदी अतुल नेहे उपाध्यक्षपदी प्रवीण गायकवाड

संगमनेर प्रतिनिधी
-: संगमनेर तालुक्यातील समनापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची नुकतीच संचालक मंडळाच्या ठरल्याप्रमाणे फेर निवड प्रक्रिया पार पडली.त्यात अध्यक्षपदी अतुल नेहे यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच भाऊसाहेब शरमाळे व अमृतवाहिनी बँकेचे माजी संचालक रामनाथ हासे यांच्या नेतृत्वाखाली सेवा सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदासाठी अतुल नेहे तर उपाध्यक्ष पदासाठी प्रवीण गायकवाड यांचे एकमेव अर्ज होते. निवडणूक अधिकारी बि. डी. शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली यांच्या संस्थेचे सचिव एस.डी. शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी अतुल नेहे उपाध्यक्ष पदासाठी प्रवीण गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याचेे घोषित केले. या निवडणुकीसाठी संस्थेचे विद्यमान संचालक बबन शरमाळे, रामू गुंजाळ, रामनाथ भास्कर, विलास भास्कर, उत्तम शरमाळे, शिवाजी शरमाळे, सोपान शरमाळे, रामदास जाधव, भाऊसाहेब भास्कर, अनिता शरमाळे, जनाबाई शरमाळे हे उपस्थित होते. यावेळी निवडीचे ग्रामपंचायत सरपंच सौ कमळाताई बेर्डे ग्रामपंचायत सदस्य नितीन शरमाळे, किशोर नेहे, उत्तम गायकवाड, एकनाथ भास्कर, पांडुरंग भास्कर,पोपट शरमाळे,चंद्रकांत नेहे,संदीप दळवी,मोहिस शेख,शेशराव नेहे,नानासाहेब नेहे,गोरक नेहे,मनोज भास्कर,अरुण हासे,प्रमोद नेहे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.